2 May 2024 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

आता सातबारा उताऱ्यावर पतीसोबत पत्नीचेही नाव असणार | राज्य सरकारचा निर्णय

Husband and wife, Saat Baara Utara, Bhumilekha, MahaLekha

मुंबई, २५ फेब्रुवारी: जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमी करणासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता सात बारा उताऱ्यावर पती आणि पत्नी दोघांचे नाव असणार आहे आणि संपत्तीवर सुद्धा पतीसोबतच पत्नीचंही नाव असणार आहे.

8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी महिलांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला जातो. शेत दोघांचे योजनेअंतर्गत पतीपत्नीचे नाव सातबाऱ्यावर आणि घर दोघांचे योजनअंतर्गत ८अ वर सुध्दा पतीपत्नीचे नाव लावण्यात येईल.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे. राज्यातील महिला बचतगटांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री करता यावी यासाठी सहकारी तसेच खाजगी मॉलमध्ये विक्रीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिला आत्मसन्मान योजनेत महिलांना सक्षम करण्यात येणार आहे. महिलांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.

महिलांना योग्य आहाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्याला आळा घालण्यासाठी महिलांसाठी काय कायदे आहेत. त्याची माहिती महिलांना होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

News English Summary: On the backdrop of International Women’s Day, the state government has made a big announcement for women empowerment. Now the husband and wife will have their names on the saat Baara Utara and the wife’s name will also be on the property along with the husband.

News English Title: Husband and wife will have their names on the Saat Baara Utara news updates.

हॅशटॅग्स

#BhulekhMahabhumi(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x