27 April 2024 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा | ब्रिटन न्यायालयाचा मोठा निर्णय

Nirav Modi, United Kingdom court

लंडन, २५ फेब्रुवारी: पंजाब नॅशनल बँकेतील 14,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार हिरा व्यावसायिक नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी मान्यता दिली. नीरव मोदीविरोधात भारतात एक खटला चालू आहे, ज्याचे उत्तर त्याला द्यावे लागेल, असंही लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितलं. नीरव मोदी याच्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि साक्षीदारांना धमकावण्याचा कट रचणे, असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.

नीरव मोदी व अन्य कारस्थानकर्ते यांच्यात संबंध होते, असे वेस्टमिनिस्टर कोर्टाचे न्यायाधीश सॅम्युल गुझी यांनी म्हटले आहे. यात पीएनबी बँकेचे अधिकारीही आहेत. “नीरव मोदी कायद्याने व्यवसाय करत होता, हे मी मान्य करणार नाही. मला एकही प्रामाणिकपणाचा व्यवहार दिसलेला नाही. या प्रक्रियेत काहीतरी घोटाळा आहे” असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

न्यायाधीश सॅम्युएल गोजी यांनी सांगितले की, नीरव मोदीला भारतामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील हे स्पष्ट आहे. दुसरीकडे नीरव मोदीने आपल्या बचावामध्ये दिलेले पुरावे परस्परांशी जुळत नाहीत. तसेच नीरव मोदीचे प्रत्यार्पण केल्यास त्याच्यासोबत न्याय होणार नाही याचा कुठलाही पुरावा दिसत नाही, असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: London’s Westminster Magistrate’s Court on Thursday approved the extradition of fugitive diamond trader Nirav Modi to India in a Rs 14,000 crore scam involving Punjab National Bank. A lawsuit is pending against Nirav Modi in India, for which he will have to answer, said a Westminster magistrate in London. There are serious allegations against Nirav Modi for destroying evidence and conspiring to intimidate witnesses.

News English Title: Nirav Modi will be extradited to India rules United Kingdom court news updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x