25 June 2022 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड 1 July Changes | 1 जुलैपासून तुमच्यावर थेट परिणाम करतील हे बदल | त्रास टाळण्यासाठी अधिक जाणून घ्या Hero Passion XTec | हिरोने लाँच केली नवी पॅशन एक्सटेक बाईक | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
x

Health First | जंक फूडमुळे मुलांना अ‍ॅलर्जीचा धोका अधिक

Junk food consumption, Risky for kids, health article

मुंबई, २५ फेब्रुवारी: हल्लीच्या मुलांना पौष्टिक आहारापेक्षाही जंक फूडची आवड अधिक असते. फळे, भाज्या, दूध यांनी परिपूर्ण आहार खायला मुलं नकार देतात. बहुतेक मुलं ही जंक फूडच्या आहारी जात चालली आहेत. सकस आहार घेण्यापेक्षा जंक फूडचा आहारात समावेश करण्याचं प्रमाण हे अधिक वाढलं आहे. जंक फूड हे आरोग्यास अत्यंत धोकादायक असल्याचं यापूर्वीही पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. मात्र असं असलं तरी लहान मुलांची जंक फूडच्या आहारी जाण्याची सवय अद्यापही सुटली नाही.

जंक फूडमुळे मुलांमध्ये स्थूलपणा येतोच मात्र जंकफूडच्या अतिरिक्त सेवनामुळे मुलांना अ‍ॅलर्जीचा धोका अधिक असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. European Society for Paediatric Gastroenterology Hepatology and Nutrition च्या वार्षिक बैठकीत एक संशोधन प्रबंध सादर करण्यात आलं. या अभ्यासानुसार मायक्रोव्हेव आणि बार्बीक्यू पदार्थ खाल्ल्यानं मुलांना अ‍ॅलर्जीचा धोका जास्त होण्याची भीती व्यक्त केली आहे.

ज्यामध्ये साखरेच प्रमाण अधिक आहे किंवा ज्यावर अधिक प्रक्रिया करण्यात आली आहे असे जंक फूड खाणं टाळा असं यात म्हटलं आहे. याचप्रमाणे मायक्रोव्हेव पदार्थ, बार्बीक्यू पदार्थ यामुळे लहानमुलांना अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता अधिक असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे.

 

News English Summary: Nowadays children are more interested in junk food than nutritious food. Children refuse to eat the perfect diet of fruits, vegetables and milk. Most of the children are going on a junk food diet. The inclusion of junk food in the diet has increased more than the healthy diet. Junk food has already been proven to be extremely dangerous to health. Even so, owning one is still beyond the reach of the average person.

News English Title: Junk food consumption is risky for kids health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x