18 May 2021 10:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

EXIT POLL: महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये भाजपाची सत्ता जाणार; मोदी-शहांना झटका

Jharkhand Assembly Election 2019

रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यापूर्वीच एक्झिट पोलचा अंदाज जाहीर झाला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार झारखंडमधून भारतीय जनता पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावं लागणार आहे. तर राज्यात जेएमएम-काँग्रेस आघाडीचं सरकार येण्याची चिन्हे असून भारतीय जनता पक्षासाठी हे निकाल धक्कादायक असल्याचं मानलं जात आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

इंडिया टुडे आणि ऍक्सिस माय इंडिया यांच्या एक्झिट पोलमध्ये २२ ते ३२, जेएमएम आणि मित्रपक्षांना ३८ ते ५०, जेव्हीएमला २ ते ४, एजेएसयूला ३ ते ५ आणि इतर पक्षांना ४ ते ७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज घेतल्यास भारतीय जनता पक्षाला ३४ टक्के, जेएमएम आणि मित्रपक्षांना ३७ टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालं. २० डिसेंबरला शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. त्यानंतर एक्झिट पोल्सचे निकाल जाहीर झाले आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा अखेरचा टप्पा २० डिसेंबरला संपुष्टात आला. झारखंड निवडणुकीचे निकाल २३ डिसेंबरला लागतील. मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने झारखंडमध्ये विजय मिळवला होता. हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा दोन क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला होता. या वेळी हेमंत सोरेन झारखंडचे मोठे दावेदार मानले जात आहेत.

कशिश न्यूज

भाजप २५-३०
कॉंग्रेस ३७-४९
AJSU २-४
इतर २-४

आईएएनएस सी वोटर एबीपी

भाजप ३२
कॉंग्रेस ३५
AJSU ५
इतर ९

इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया

भाजप २२-३२
कॉंग्रेस ३५
AJSU ५
इतर ९

सध्याचं पक्षीय बलाबल

भाजप : ३७
जेएमएम: १९
काँग्रेस: ७
जेव्हीएम: ८
जेएसयू : ५
इतर : ६
एकूण: ८१

 

Web Title:  Jharkhand Exit Polls results says Congress and JMM to take lead BJP.

हॅशटॅग्स

#Amit Shah(256)#Narendra Modi(1546)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x