13 December 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

Stocks To Buy | एका महिन्यात 23-25 टक्के परतावा कमवायचा आहे? तज्ज्ञांनी सुचवलेले हे दोन शेअर्स सेव्ह करा

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या जर तुम्ही शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी शेअर्स शोधत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकदारांना 30 दिवसासाठी दोन शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे पुढील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 23-25 टक्के वाढ होऊ शकते. सध्या शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा काळात तुम्ही हे दोन स्टॉक खरेदी करून काही प्रमाणात नफा कमवू शकतात.

MRPL शेअर :

तज्ञांनी मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ही कंपनी मुळात ONGC ची उपकंपनी असून ती मिनीरत्न दर्जा प्राप्त असलेली कंपनी आहे. मागील या कंपनीचे शेअर्स 86.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 86-82 रुपये किमतीमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासह तज्ञांनी स्टॉकवर 100 रुपये पहिली लक्ष किंमत, आणि 107 रुपये दुसरी लक्ष किंमत निश्चित केली आहे. गुंतवणूक करताना नेहमी स्टॉप लॉस लावावा. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर 77 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.19 टक्के घसरणीवसह 84.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

MRPL सविस्तर कामगिरी :

मागील महिन्यात एमआरपीएल कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. मागील वर्षी या कंपनीने 2707 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर जून तिमाहीत कंपनीच्या नफ्यात घट झाली असून, कंपनीचा नफा 1013 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी जून तिमाहीत या कंपनीने 35915 कोटी रुपये महसूल संकलित केला होता तर जून तिमाहीत कंपनीने 24832 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. कंपनीचे ग्रॉस रिफायनरी मार्जिन प्रति बॅरल 24.45 डॉलर्स वरून कमी होऊन 9.81 डॉलर्सवर आले आहे. कंपनीच्या कर्जात 1557 कोटी रुपयेवरून 14993 कोटी रुपये रुपये एवढी घट झाली आहे.

देवयानी इंटरनॅशनल :

शेअर बाजारातील तज्ञांनी देवयानी इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 198.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी हा स्टॉक 200-195 रुपये दरम्यान खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शेअरची पहिली लक्ष्य किंमत 225 रुपये असेल, तर दुसरी लक्ष किंमत 237 रुपये असेल. गुंतवणूक करताना तज्ञ नेहमी स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देतात. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर 185 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के घसरणीसह 197.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

देवयानी स्टॉक सविस्तर कामगिरी :

ऑगस्ट 2023 मध्ये या कंपनीने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने 47 नवीन स्टोअर सुरू केले असून त्यांची एकूण स्टोअरची संख्या 1,290 वर पोहचली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये या कंपनीने 275-300 नवीन स्टोअर्स सुरू करण्याचे उ्दिष्ट निश्चित केले आहे. जून तिमाहीत कंपनीच्या एकत्रित महसुलात 20 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर कंपनीचा EBITDA 14.6 टक्क्यांच्या वाढीसह 173.4 कोटी रुपयेवर पोहचला आहे. जून तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 20.5 टक्के नोंदवला गेला आहे. तर एकूण मार्जिन 120 बेसिस पॉइंट्सच्या वाढीसह 70.8 टक्के नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 14 August 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x