29 April 2024 11:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

फेक फोटो वरून आंदोलन | पण हा आहे भाजपचा फेक फोटो-व्हिडिओ शेअर करण्याचा इतिहास

BJP, edited photo, Chitra Wagh

मुंबई, २७ फेब्रुवारी: सध्या चित्र वाघ यांचा एडिटेड फोटो शेअर करण्यावरून भाजपने थेट आंदोलन सुरु केले आहे. काही करून राज्यातील वातावरण केवळ पेटत ठेवायचं एवढाच काय तो उद्योग म्हणावा लागेल. त्याचे फोटो मुळात कोणी एडिट केले आणि शेअर केले ते अजूनही समोर आलेलं नाही. त्यामुळे ते आधी समोर येणं गरजेचं आहे. मात्र आज स्वतः देवेंद्र फडणवीस देखील ट्विटरवर या आदोलनाचे ट्विट करत आहेत.

परंतु समाज माध्यमांवर फेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याचा ट्रेंड कोणी आणला हे आज समोर देशाला माहित आहे. त्यात देशातील सोडा इथे राज्यातील भाजप, खासदार आणि मंत्री पद उपभोगलेल्या भाजप नेत्यांनी देखील फेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केल्याचा इतिहास आहे. अगदी त्यात स्वतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश आहे.

दिल्लीतील जेएनयू आंदोलन बदनाम करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कमी दर्जाचा व्हिडिओ (Reducing Quality) बनवून त्यातील आवाजाचा दर्जा सुस्पष्ट राहणार नाही याची काळजी घेत “मॉर्फिंग” व्हिडिओ पसरवला आणि हिंदुत्व शब्दां ऐवजी “हिंदुओं की कबर खुदेगी, एएमयू की छाती पर” अशी लाईन वापरून, हिंदू समाजाची माथी भडकविण्याची रणनीती आखली होती आणि भाजपच्या मोठ्या नेत्यांनी तो शेअर केला होता. त्यात स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश होता. अगदी फॅक्ट चेक मध्ये देखील ते सिद्ध झालं होतं.

तसेच भाजपचे आमदार राम कदम यांनी तर खोटा आणि एडिटेड व्हिडिओ शेअर करताना लहान मुलाचा वापर करत मोदी यांच्या प्रसिद्धीचा खोटा प्रचार केला होता. त्यात दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कँसर झाल्याचा वृत्तानंतर तिचा मृत्यू झाल्याचं ट्विट केलं होतं.

त्यानंतर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल प्रमुख आशिष मरखेड हा प्रसार माध्यमांच्या नावाने खोट्या बातम्या बनवून ते समाज माध्यमांवर पसरवताना पकडला गेला होता. विशेष एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या ८ जानेवारीच्या राहुल गांधी याच्या मूळ बातमी मध्ये धार्मिक बदल करून ती स्वतःच्या अधिकृत ट्विटरवरून प्रसिद्ध करताना पकडला गेला होता.

तसेच भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी २८ नोव्हेंबर रोजी एक फॅक्ट चेक ट्विट पोस्ट केलं होतं. यामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून शेअर केलेला फोटो एका बाजुला तर दुसऱ्या बाजुला याच फोटोशी संबंधित व्हिडिओ मालवीय यांनी स्वतःच्या अकांउंटवरून ट्विट केला होता. राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोत शेतकरी आंदोलनाशी संबंधित एका वृद्ध शेतकऱ्यावर लाठीचार्ज करणाऱ्या एका हरयाणा पोलिसाची छबी कैद झाली होती. सदर फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाला होता. राहुल गांधी धादांत खोटं बोलत असल्याचं सांगत अमित मालवीय यांनी ‘प्रोपगंडा व्हर्सेस रिअॅलिटी’ असं नाव देत एक व्हिडिओ शेअर केला होता.

त्यात अमित मालवीय यांनी भारताला दीर्घकाळानंतर एक अविश्वसनीय विरोधी नेता मिळाल्याचं’ अमित मालवीय यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसंच पोलिसानं संबंधित शेतकऱ्यावर फक्त काठी उगारली मात्र, ती काठी शेतकऱ्याला स्पर्शून देखील गेली नसल्याचा दावा मालवीय यांनी समाज माध्यमांद्वारे केला होता. मालवीय यांच्या याच ट्विटवर ट्विटरकडून ‘छेडछाड करण्यात आलेली सामग्री’ असा शेरा दिसून येतोय. म्हणजे त्यांनी केलेला व्हिडिओ खोटा असल्याचं खुद्द ट्विटरने म्हटलं होतं.

पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात भाजपाच्या महिला प्रियांका शर्मा यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सोशल मीडियावर छेडछाड केलेला पोफॉ शेअर केल्याचा आरोपाखाली अटक झाली होती. स्वतः पोलिसांनी त्याबाबत दुजोरा दिला होता.

 

News English Summary: Currently, the BJP has started a direct agitation by sharing an edited photo of Chitra Wagh. The industry has to do something to keep the atmosphere in the state burning. It is unknown at this time what he will do after leaving the post. So it needs to come up first. But today Devendra Fadnavis himself is tweeting this agitation on Twitter.

News English Title: BJP has started a direct agitation by sharing an edited photo of Chitra Wagh news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x