9 May 2025 12:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल Cheque Bounce Alert | चेकने पेमेंट करणाऱ्या 90% लोकांना माहित नाही, ही चुका करू नका, सर्वकाही गमावून बसाल EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Horoscope Today | 09 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

...तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामे देतील - फडणवीस

BJP members, Joint Committee, Shakti Act, Devendra Fadnavis

मुंबई, २८ फेब्रुवारी: महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा तयार केला जात आहे. पण राज्यातील मंत्रीच जर महिलांच्या अत्याचारात सहभागी असतील तर हा कायदा काय कामाचा?, असा सवाल करतानाच राठोडांनी राजीनामा दिला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामे देतील, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली. राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. ते रोखण्यासाठी सरकारने शक्ती कायदा आणला आहे. पण राज्यातील मंत्रीच या अत्याचारात सहभागी आहेत.

सत्ता पक्षाच्या लोकांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नव्या कायद्याने दिली आहे का? ही कोणती शक्ती आहे? सामान्यांना एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय असं काही आहे का? असा सवाल करतानाच राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व आमदार राजीनामा देतील, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. हा कायदा म्हणजे एक प्रकारचा फार्स आहे. मंत्र्यांचा राजीनामाच होत असेल तर या समितीत उपस्थित राहून काय फायदा? असा सवालही त्यांनी केला आहे.

 

News English Summary: The Shakti Act is being drafted to prevent atrocities against women. Opposition leader Devendra Fadnavis has warned that if Rathore does not resign, then what is the point of this law if only state ministers are involved in atrocities against women? If not, all BJP members will resign from the Joint Committee on Shakti Act.

News English Title: BJP members will resign from the Joint Committee on Shakti Act said Devendra Fadnavis news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या