शेलार यांच्या विधानाशी असहमती | सुप्रिया सुळेंना आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही - चंद्रकांत पाटील
मुंबई, २१ नोव्हेंबर: ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी बोलताना शेलारांनी मराठा समाजातल्या स्त्रियांच्या कर्तृत्त्वावर भाष्य केलं. ‘मोठ्या पदावर मोठ्या मनाच्या व्यक्ती फार कमी असतात. ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकात शरद पवारांच्या आई शारदाबाई यांच्याबद्दल जे लिहिलंय, ते अतिशय प्रेरणादायी आहे. मराठा समाजातली कर्तृत्ववान स्त्री मुख्यमंत्री व्हावी, असं मला वाटतं. तसं होणार असेल, तर त्याला माझं समर्थन आहे,’ असं शेलार म्हणाले होते.
आशिष शेलार यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेलार यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. अनेकांनी शेलार यांच्या विधानाचा संदर्भ भारतीय जनता पक्षामध्ये सुरू असलेल्या ताज्या घडामोडींशी जोडला आहे. आमदार आशिष शेलार यांच्या त्या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्या पुस्तकाचा संदर्भ देताना त्यांचं ते वक्तव्य होतं. सुप्रिया सुळेंना आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते वक्तव्य आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठा महिला, भारतीय जनता पक्षाच्या मराठा महिला आणखी कोणाबाबत नाही. त्या पुस्तकातल्या बाबींशी त्या वक्तव्याचा संदर्भ आहे. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं का नाही करायचं हे त्यांनीच ठरवायचं असल्याचंही ते म्हणाले.
News English Summary: Bharatiya Janata Party leader Chandrakant Patil has clarified the role. That was his statement while referring to that book. There is no question of supporting Supriya Sule, ”said Chandrakant Patil. That statement is not about the Maratha women of the NCP or the Maratha women of the Bharatiya Janata Party. That statement refers to matters in that book. He also said that he wanted to decide whether to make Supriya Sule the Chief Minister or not.
News English Title: BJP State President Chandrakant Patil disagree with statement made by Ashish Shelar on NCP MP Supriya Sule as Chief Minister of Maharashtra News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट