16 December 2024 2:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

मुंबईतील दोघांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

Corona Virus, Rajesh Tope

मुंबई: राज्यातील कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या दोघांच्या चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या असून राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा ७ वर पोहचला आहे. राज्यात दुबईहून परतलेल्या पुण्यातील कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याच कुटुंबियांच्या विमानातून मुंबईत आढळलेल्या रुग्णांनी प्रवास केला होता. या रुग्णांवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळी काही रुग्णांना कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र, त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं. पुण्यातील दाम्पत्यासोबत सहलीसाठी गेलेल्यामध्ये यवतमाळ, मुंबई, ठाणे अशा ठिकाणच्या अनेक व्यक्तींचा समावेश होता. प्रवासादरम्यान या जोपडप्याच्या संपर्कात आलेल्या ४० प्रवाशांचाही शोध लागला असून त्यांना आरोग्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच त्यांची तपासणीही होणार आहे अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली होती.

मुंबईत करोनाचा एकही रुग्ण नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकाळी स्पष्ट केले होतं. मात्र आता तो आकडा दोनवर गेला आहे हे स्पष्ट झालं आहे.

 

News English Summery: Two more people have been found infected with corona virus in the state. The tests for the two under surveillance at Kasturba Hospital in Mumbai have come positive and the number of coronary infected patients in the state has reached 7. The Pune family who returned from Dubai in the state was facing corona infection. Patients found in Mumbai were traveling by plane from the same family. The patients are undergoing treatment at Kasturba Hospital in Mumbai.

 

Web News Title: story 2 more Corona Virus positive cases in Mumbai state health department confirmed seven corona positive cases in the Maharashtra State.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x