28 April 2024 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

आधार-पॅन कार्ड 'या' तारखे आधी करा लिंक | अन्यथा भरावा लागेल १० हजार रुपयांचा दंड

Link your Aadhaar Pan card before this date otherwise pay a penalty news updates

मुंबई, २५ मार्च: तुम्हाला कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे असेल तर तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्डची गरज भासते. त्याचबरोबर ही भारतीय असल्याची ही दोन महत्त्वाची ओळखपत्रे ही एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोणतेही महत्त्वाचे आणि मोठे आर्थिक व्यवहार करता येणार नाही. अजूनही तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर ताबडतोब करा. कारण सरकार या अशा लोकांवर कडक कारवाई करणार आहे. त्यासाठी आयकर विभागाने अंतिम तारीख दिली आहे. त्या तारखेआधी तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करा.

रिपोर्टनुसार, येत्या 31 मार्च 2021 पर्यंत तुम्ही तुमचे आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. या तारखेपर्यंत जर कुणी हे काम केले नाही तर त्यांना 10,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. आयकर विभागाने याबाबत माहिती दिली असून आधारकार्ड पॅन कार्डशी लिंक न करणा-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असेही सांगण्यात येत आहे. हे काम न करणा-यांना पॅनकार्डधारकांचे न केवळ गैर पॅनकार्डधारक माानले जाईल तर त्यांना आयकर अधिनियमांतर्गत कलम 272बी 10,000 रुपयांचा दंड भरावा लागेल.

बँक अकाउंट खाते उघडण्यासाठी, म्युचअल फंड वा शेअर खरेदी करण्यासाठी वा 50,000 रुपयांपेक्षा जास्त कॅश ट्रान्जेक्शन करण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. तथापि, असे सर्व इनऑपरेटिव पॅनकार्ड ऑपरेटिव होतील. त्यासाठी आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक होणे गरजेचे आहे.

  1. आधार आणि पॅन कार्ड SMS द्वारे लिंक करण्यासाठी 56161 किंवा 567678 या क्रमांकावर टेक्स्ट मेसेज करा.
  2. यासाठी UIDPAN<12 Digit Aadhaar> <10 Digit PAN> असा मेसेज करा.
  3. उदा. तुमचा आधार कार्ड नंबर 586738291086 असेल आणि पॅन कार्ड नंबर KBJH11234M असेल.
  4. तर मेसेज UIDPAN 586738291086 KBJH11234M असा टाईप करा आणि मेसेज 56161 किंवा 567678 या क्रमांकावर पाठवा.

 

News English Summary: If you want to do any financial transaction, you need Aadhaar card and PAN card. At the same time, these two important Indian identity cards need to be linked to each other. Without it no important and big financial transactions can be done. If you still have not linked your Aadhar card to PAN card, do it immediately. Because the government is going to take strict action against such people. The Income Tax Department has given a deadline for this. Before that date you link your Aadhar card with PAN card.

News English Title: Link your Aadhaar Pan card before this date otherwise pay a penalty news updates.

हॅशटॅग्स

#Aadhar Card(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x