2 May 2024 6:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

संतापजनक | भारतीयांना नव्हे...तर मोदी सरकारकडून परदेशात सर्वाधिक लसीचा पुरवठा

Modi Government, Vaccination, Corona vaccine

नवी दिल्ली, २७ मार्च: देशात कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस भयावह होत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी 62,276 नवीन रुग्ण आढळले. 30,341 बरे झाले आणि 292 जणांचा मृत्यू झाला. सर्वात जास्त वाईट परिस्थिती महाराष्ट्राची आहे. येथे एका दिवसात 36,902 संक्रमित आढळले. हा आकडा 11 सप्टेंबरला आलेल्या पहिल्या सर्वोच्च स्तरापेक्षाही दीडपट जास्त आहे. तेव्हा येथे 24,886 प्रकरणे समोर आली होती.

देशात आतापर्यंत 1.19 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून जवळपास 1.13 कोटी लोक बरे झाले आहेत. 1,61,275 रुग्णांनी जीव गमावला आहे. सध्या 4.49 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.

एका बाजूला देशात 1,61,275 रुग्णांनी जीव गमावला आहे . भारतातील लोकांचा जीव वाचविण्यास प्राधान्य द्यायचं सोडून मोदी सरकारने केलेल्या कृत्याने अनेकांनी संताप करण्यास सुरुवात केली आहे. कारण मोदी सरकारच्या वतीने संयुक्त राष्ट्रात देण्यात आलेल्या माहितीमुळे मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेल्या दाव्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण पाहायला मिळू शकतं. कारण भारताने आपल्या देशातील नागरिकांना जेवढ्या कोरोनाच्या लसींची डोस दिले नाहीत त्याहून अधिक डोस परदेशामध्ये निर्यात केलेत, असं स्वतः मोदी सरकारने संयुक्त राष्ट्रांसमोर सांगितलं आहे. लसींचे डोस निर्यात करण्याआधी भारतीयांना प्राधान्य देत त्यांचं लसीकरण सरकारने केलं अशतं तर सध्या देशात दिसणारी करोनाची दुसरी लाट थांबवता आली असती. पण मोदी सरकारने तब्बल ७० देशात लस निर्यात केली असून त्यात भारतीयांना दुय्यम स्थान म्हणजे भारतातील लोकांपेक्षा जगभरात अधिक लस पुरविण्यात आली आहे. या वृत्तामुळे मोदींना आंतरराष्ट्रीय नेते होण्याची घाई झाली आहे का असा प्रश्न समाज माध्यमांवर उपस्थित होऊ लागला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी नागराज नायडू यांनी त्यासंदर्भात थेट संयुक्त राष्ट्रात माहिती दिली आहे.

 

News English Summary: If the government had not vaccinated Indians before exporting doses of vaccines, the second wave of corona in the country could have been stopped. But the Modi government has exported vaccines to as many as 70 countries, with Indians being the second largest supplier of vaccines in the world. The news has raised questions on social media as to whether Modi is in a hurry to become an international leader. Nagraj Naidu, India’s Permanent Representative to the United Nations, has informed the United Nations directly.

News English Title: Modi Government provided more vaccines to other countries than India news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x