6 May 2024 5:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेजचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

पंढरपूर-मंगळवेढा | पडळकरांनी आवताडेंना बारामतीतील निकालाची आठवण करून दिली?

BJP MLA Gopichand Padalkar, Pandharpur Mangalvedha,  by poll election, MLA Bharat Bhalke

पंढरपूर, ३० मार्च:

पंढरपूर, ३० मार्च: राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांची निवडणुक १७ एप्रिलला होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली होती. सध्या भारत भालके यांच्या कुटुंबियांबद्दल मतदारसंघात भावनिक वातावरण असल्याने त्याचा फायदा भगिरथ भालके यांना होण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या दोन्ही बाजूंनी प्रचाराची तयारी सुरु झाली असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत.

भाजपने देखील मतदारसंघात बैठका सुरु केल्या आहेत. मात्र भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामतीच्या निवडणुकीतील स्वतःचा अनुभव सांगताना अप्रत्यक्षरित्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात देखील तीच भीती व्यक्त तर केली नाही ना अशी शंका येऊ शकते. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्यावर कुणी तिकीट देईल का, पण मला दिलं. माझी आमदार होण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. तशीच इच्छा समाधान आवताडेंची आहे, त्यांची इच्छाही पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत पूर्ण होईल”, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. ते पंढरपुरात बोलत होते. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडे भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं आहे.

आता हे पाहावं लागणार आहे की समाधान आवताडे यांना देखील पडळकर यांच्याप्रमाणे विधानसभेचा अनुभव तर येणार नाही ना? दरम्यान, या दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. समाधान आवताडेंच्या पहिल्या प्रचार सभेदरम्यान भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड नेते गोपीचंद पडळकर यांनी यावेळी अनेक मुद्यांना हात घातल्याचं पाहायला मिळालं.

 

News English Summary: Speaking on the occasion, Gopichand Padalkar said, “Will anyone give me a ticket in Baramati after the deposit is confiscated, but it was given to me. My wish to become an MLA was fulfilled. The same wish is satisfied.

News English Title: BJP MLA Gopichand Padalkar talked on Pandharpur Mangalvedha by poll election news updates.

हॅशटॅग्स

#GopichandPadalkar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x