मुंबई : मुंबईतील मालवणी येथे ख्रिश्चनांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी प्रकाश झोतात आले आहेत. परंतु त्यांच्या विधानाने पक्ष गोत्यात आल्याने त्यांची दिल्लीश्वरांनी चांगलीच खरडपट्टी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी प्रचंड नाराज असल्याचे समजते. त्यामुळे ते थेट राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
ख्रिश्चनांनी स्वातंत्र्यलढ्यात कोणतंही योगदान दिलेले नाही असं वादग्रस्त वक्तव्य गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चनांसंदर्भात केल्याने आगामी निवडणुकीपूर्वी ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याने त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत उमटू शकतात हे ध्यानात घेऊन पक्षाने त्यांची खरडपट्टी केली आहे. परंतु त्यांनी भाषणस्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करत आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे स्पष्ट करत केलं आहे.
खासदार गोपाळ शेट्टींच्या या वादग्रस्त विधानाने भाजप आगामी निवडणुकीत चांगलीच गोत्यात घेण्याची चिन्हं आहेत. संबंधित प्रकरणात गोपाळ शेट्टींनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे सांगत एक परिपत्रक प्रसिद्ध केल आहे.
