7 May 2025 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? | पवारांची अहमदाबादला भेट? | जयंत पाटील यांचं उत्तर

Minister Jayant Patil, Sharad Pawar, Ahmadabad

मुंबई, ०१ एप्रिल: राज्यात सध्या अनेक विषयांवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अहमदाबादमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असं वृत्त समोर आलं आणि महाराष्ट्रात राजकीय वारे वाहण्यास सुरुवात झाली. अर्थात राष्ट्रवादीने ही भेट झाली नसल्याचे म्हटले असले तरी चर्चा या सुरुच आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातमध्ये जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. या भेटीसंदर्भात राष्ट्रवादीनं आतापर्यंत भेट झालीच नसल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनीही भेटीच्या वृत्तात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना हे वक्तव्य केले आहे.

साखर उद्योगातील परिषदेसाठी पवार साहेब अहमदाबादला गेले होते, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. पवार-शहा यांच्या भेटीच्या बातम्या उठवण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून सतत करत आहे. आमची महाविकास आघाडी तोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून हे प्रयत्न सुरू आहेत, असं पाटील यांनी सांगितलं. याआधी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीदेखील अशाच प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मात्र केंद्रातील नेतृत्वानं आदेश दिल्यास अंमलबजावणी करू, अशी भूमिका घेतली.

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप जवळ जाणार नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. म्हणून पवार साहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली. या चर्चांमध्ये अर्थ नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला कोरोनाचे काही पडले नाही. काही झालं तरी आम्ही सत्तेत कसं यावं याकडे त्यांचं लक्ष आहे.

 

News English Summary: The state is currently undergoing a number of debates on a number of issues. News came that Sharad Pawar and Amit Shah had met in Ahmadabad and political winds began to blow in Maharashtra. Although the NCP has said that the meeting did not take place, discussions are still going on.

News English Title: Minister Jayant Patil clarify on Sharad Pawar visit to Ahmadabad news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या