8 December 2021 6:56 PM
अँप डाउनलोड

Anil Deshmukh Vs CBI | अनिल देशमुख यांचे पुत्र सलील आणि सुनेविरुद्ध सीबीआयचे अटक वॉरंट

Anil Deshmukh Vs CBI

नागपूर, 11 ऑक्टोबर | आज सकाळी सीबीआयचे एक पथक दाखल त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी दाखल झाले आहे. ज्यामध्ये सहा अधिकारी असून एक महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे. सीबीआयचे पथक अनिल देशमुख यांचे पुत्र सलील आणि सुनेविरुद्ध अटक वॉरंट (Anil Deshmukh Vs CBI) घेऊन आलेले आहे. मात्र, विविध यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई सुरू झाल्यापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय अज्ञातवासात गेले आहेत. त्यामुळे आता सीबीआयचं पथक अटक वॉरंट संदर्भात काय निर्णय घेतं हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Anil Deshmukh Vs CBI. A CBI team arrived at his residence in Nagpur this morning. Which includes six officers and one female officer. A CBI team has issued arrest warrants against Anil Deshmukh’s son Salil and daughter in law :

अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एक पथक अटक वॉरंट घेऊन दाखल झाले. काही दिवसांपूर्वी देखील आयकर विभागाने देखील छापे टाकून कागदपत्रांची पडताळणी केली होती. त्याआधी ईडीने सुद्धा देशमुख यांच्या नागपूर, काटोल आणि मुंबई येथील निवासस्थानी धाडी टाकल्या होत्या. देशमुख यांच्या निवासस्थानी कुटुंबातील कुणीही नाही. गेल्या काही महिन्यांपासून अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय अज्ञातवासात गेले आहेत. त्यांचा कुणाशी संपर्क नसल्याने आता सीबीआयचं पथक जेव्हा त्यांच्या घरी दाखल झालेलं आहे. त्यावेळी घरात मात्र कुटुंबातील कुणीही उपस्थित नसल्याचं पुढे आले आहे.

मनी लॉण्ड्रिंगचा आरोपही देशमुख यांच्यावर आहे. यापूर्वी ईडी व सीबीआयनं अनेकदा देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरी छापे टाकले होते. देशमुख यांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं होतं. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Anil Deshmukh Vs CBI issued arrest warrant against Salil Deshmukh a son of Anil Deshmukh.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x