27 April 2024 2:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

धारावी-वरळीत कोरोनाला रोखण्यासाठी निरोगी लोकांना पालिका देणार औषध

Corona Virus, BMC, Medicine

मुंबई, १२ मे: मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हे औषध धारावी आणि वरळी कोळीवाड्यातील नागरिकांना देण्यात येणार आहे. सध्या धारावी आणि वरळी हे दोन्ही हॉटस्पॉट क्षेत्र आहेत. त्यामुळं येथील निरोगी नागरिकांच्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे औषध देण्यात येणार आहे. याआधी नागरिकांना हायड्रोक्लोरोक्विन हे औषध देण्यात येणार होते, मात्र त्याचे शरीरावर होणारे विपरित परिणाम लक्षात घेता, हा निर्णय रद्द करण्याता आला.

महापालिकेकडे आरजू स्वाभीमान नागरी समितीनं अर्सेनिक अल्बत ३० या गोळ्या नागरिकांना तसेच हॉटस्पॉट परिसरातील वृद्धांना देण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार आता या औषधाचे वितरण धारावी आणि वरळी या क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. आजपासून धारावी, माहिम दादर परिसरात या औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान, पालिकेने या औषधाचे वितरण करण्याची परवानगी दिली असली तरी, हे औषध घ्यायचे की नाही हा निर्णय नागरिकांचा असणार आहे. काही दिवस पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाहणी करण्यात येणार आहे.

दुसरीकडे अ‍ॅंटीव्हायरल ड्रग फॅव्हीपीरावीर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या भारतात सुरु झाल्या आहेत अशी माहिती ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेडने मंगळवारी दिली. फॅव्हीपीरावीर हे करोना व्हायरसवर प्रभावी ठरणाऱ्या औषधांपैकी एक आहे. एप्रिल महिन्यात भारतातील औषध नियमन करणाऱ्या संस्थेकडून फॅव्हीपीरावीर औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांना परवानगी मिळाली होती.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिलेल्या परवानगीमुळे Covid-19 च्या रुग्णांवर औषधाची चाचणी घेण्याची परवानगी मिळालेली आपण पहिली कंपनी ठरल्याचे ग्लेनमार्ककडून सांगण्यात आले. जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते. जपानमध्ये ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर करण्याची २०१४ मध्ये परवानगी देण्यात आली.

“भारतात फॅव्हीपीरावीर औषधाच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. दहा किंवा त्यापेक्षा जास्त सरकारी-खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर या चाचण्या घेण्यात येतील. जुलै-ऑगस्टपर्यंत या चाचण्यांचे निष्कर्ष समोर येतील” असे ग्लेनमार्ककडून सांगण्यात आले.

 

News English Title: Mumbai BMC to give Arsenicum album 30 in Mumbai most affected zone to improve immunity in Corona virus outbreak News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x