28 April 2024 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

सत्तेसाठी लोकांच्या जीवाशी खेळ?, मोदी सरकार म्हणजे माणुसकीला काळीमा आहे - भाई जगताप

Mumbai congress, MLA Bhai Jagtap, Covid vaccine

मुंबई, १० एप्रिल: कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस मिळवण्याच्या धडपडीत लसीचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशानंतर आता बिहार, उत्तर प्रदेशातही लसीचा तुटवडा हाेऊ लागला आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. अनेक राज्यांत एक ते दाेन दिवसांचाच साठा शिल्लक आहे. परंतु राज्यांना पाठवण्यात येणाऱ्या लसीमध्ये राजकारण हाेत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळून लावला आहे. काेलकात्यामध्ये एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले, लसीची काेणतीही कमतरता नाही. सर्व राज्यांच्या गरजेनुसार लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसरीकडे काही राज्यांमधील भोंगळ कारभार देखील समोर आला आहे.

गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या दुप्पट आहे. तरीही केंद्र सरकारने गुजरातला आतापर्यंत 1 कोटी लसींचा साठा दिला आहे. तर महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 1 कोटी 14 लाख लसी आल्या आहेत, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणाविषयी नाराजी व्यक्त होती.

त्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. यासंदर्भात ट्विट करताना आमदार भाई जगताप म्हणाले कि, “भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांना व इतर राज्यांना लसींचा पुरवठा करताना भेदभाव केला जातोय…सत्तेसाठी लोकांच्या जीवाशी खेळ..?? मोदी सरकार म्हणजे माणुसकीला काळीमा आहे..!!

 

News English Summary: There is a shortage of vaccines in the struggle to get vaccinated against the corona virus. After Maharashtra, Andhra Pradesh and Odisha, now there is a shortage of vaccines in Bihar and Uttar Pradesh. Vaccination centers had to be closed in many places in these states. Many states have stocks of only one to two days.

News English Title: Mumbai congress president Bhai Jagtap slams Modi govt over covid vaccine supply politics news updates.

हॅशटॅग्स

#BhaiJagtap(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x