13 May 2021 1:58 AM
अँप डाउनलोड

अजित पवारांचा संभाजीराजेंना फोन, उद्या मुंबईत महत्वाची बैठक

Deputy CM Ajit Pawar, MP Sambhaji Raje, Maratha Sarathi

मुंबई, ८ जुलै : पुण्यातील सारथी संस्थेवरून वाद पेटला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली आहे. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संभाजीराजेंना फोन केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. बैठकीत सारथी संस्थेच्या वादावर चर्चा झाली. सारथी संस्थेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी उद्या गुरुवारी मुंबई बैठक आयोजित करण्यात आली आहे . राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना फोन करून उद्या होणाऱ्या या बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले आहे.

याबाबत संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या व प्रचंड त्यागातून मिळवलेल्या सारथी संस्थेबाबत समाजाने जे आंदोलन उभं केलं आणि दबाव निर्माण केला त्याचा आदर करत सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. उपमुख्यमंत्री पवारांनी मला फोन करून मुंबईला चर्चेसाठी येण्याची विनंती केली. काही महिन्यांपूर्वी समाजाच्या वतीने पुण्यात सारथी कार्यालयाच्या बाहेर लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी जी आश्वासने सरकारने दिली होती, ती न पाळल्याचा अनुभव गाठीशी असताना सुद्धा समाजाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवणे हे माझे कर्तव्य समजून पुन्हा चर्चेला जाण्याचा निर्णय घेत आहे. माझ्यासाठी समाजाचे हित सर्वोच्च आहे असं त्यांनी सांगितले.

 

News English Summary: A controversy has erupted over the Sarathi organization in Pune. MP Sambhaji Raje Chhatrapati had expressed displeasure over the statement made by Congress leader Vijay Vadettiwar. After that, a meeting has been called by the state government to resolve the issue. Deputy Chief Minister Ajit Pawar himself has called Sambhaji Raje.

News English Title: Deputy CM Ajit Pawar calls MP Sambhaji Raje An meeting will be held tomorrow over maratha Sarathi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x