तर भारतात प्रतिदिन २ लाख ८७ हजार कोरोना रूग्ण आढळतील - MIT संशोधन
नवी दिल्ली, ८ जुलै : जगात कोरोना विषाणू आणखी भयानक बनला आहे. दररोज सुमारे दोन लाख नवीन रुग्ण वाढले आहेत. अमेरिकेत तर परिस्थिती अधिक वाईट दिसत आहेत. गेल्या चोवीस तासांत येथे ६० हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जी आजपर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत अमेरिकेत एकूण ६०२०९ नवीन रुग्ण वाढले आहेत. या व्यतिरिक्त १११४ मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यूची संख्या आता १.३१ लाखांच्या पुढे गेली आहे. तर एकूण संक्रमितांची संख्या जवळपास ३१ लाखांवर आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूच्या बाबतीत गेल्या एका आठवड्यात प्रचंड वाढ झाली आहे आणि दररोज सरासरी ५० हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. अमेरिकेत जवळजवळ सर्व काही उघडलेले आहे आणि लोक कोणत्याही निर्बंधाशिवाय वावरत आहेत.
तसेच अमेरिकेत घेण्यात येणाऱ्या चाचण्यांची संख्या बर्यापैकी जास्त आहे. अमेरिका दररोज सुमारे ५ लाख चाचण्या करत आहे. अमेरिकेत आतापर्यंत तीस कोटीहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, कोरोनावर लवकरात लवकर लस सापडली नाही तर भारतात करोना महामारी गंभीर रुप धारण करण्याची शक्यता आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून (एमआयटी) करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज दर्शवण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत भारतात दिवसाला २ लाख ८७ हजार करोनाबाधित रुग्णांची नोंद होईल असं सागंण्यात आलं आहे. ८४ देशांमधील टेस्टिंग आणि केस डेटाच्या आधारे हा अभ्यास कऱण्यात आला. यामध्ये जगभरातील एकूण ६० टक्के लोकसंख्येचा समावेश करण्यात आला होता.
एमआयटीचे संशोधक हाजहीर रहमानदाद, टी वाय लिम आणि जॉन स्टेरमन यांनी हा अभ्यास केला आहे. यासाठी त्यांनी साथीचा रोग विशेषज्ञांकडून वापरण्यात येणाऱ्या SEIR (Susceptible, Exposed, Infectious, Recovered) या मॉडेलचा वापर केला. या अभ्यासानुसार उपचार उपलब्ध न झाल्यास २०२१ मधील मार्च-मे महिन्यात जगभरातील करोनाबाधितांची संख्या २० ते ६० कोटी दरम्यान असेल.
या अभ्यासानुसार, फेब्रुवारी २०२१ च्या अखेरीस करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल. यानंतर अनुक्रमे अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि इऱाणचा समावेश असेल. अमेरिकेत दिवसाला ९५ हजार, दक्षिण आफ्रिकेत २१ हजार आणि इराणमध्ये १७ हजार रुग्णांची नोंद होईल असा अंदाज आहे.
News English Summary: Researchers at the Massachusetts Institute of Technology (MIT) have predicted that India could be in a worse shape by next year if a vaccine is not found. According to their study, India could be the worst-affected country in the world with 2.87 lakh cases every day. The study also revealed that the number of cases worldwide could be significantly high if treatment is not found.
News English Title: MIT Study Reveals India Might See 2 87 Lakh Covid Cases Per Day By February 2021 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC