23 March 2023 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Realme Narzo 50 5G | रियलमी Narzo 50 5G स्मार्टफोनवर 26% डिस्काउंट, जबरदस्त ऑफर्सबद्दल जाणून घ्या Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या
x

Fact-Check: शाळा-कॉलेज सुरु करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाची महत्वाची सूचना

Lockdown, Corona Virus, Schools and Colleges

नवी दिल्ली, २७ मे : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी चोवीस तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने वाढली आहे. तर एका दिवसांत एकूण १७० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

एका दिवसात सहा हजारहून अधिक रुग्णांची वाढ झाल्यामुळं आता देशातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १,५१,७६७ वर पोहोचला आहे. ज्यामध्ये ८३००४ रुग्णांवर अद्यापही रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. तर, तब्बल ६४,४२५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

दरम्यान, देशभरातील शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था सुरु कऱण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सर्व राज्यांना शाळा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यम्यांनी दिल्याने आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून यासंबंधी ट्विट करण्यात आलं आहे. “केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असा कोणताही निर्णय़ घेण्यात आलेला नाही. देशभराती सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम आहेत,” अशी माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे.

 

News English Summary: According to the Union Home Ministry, no permission has been given to start schools, colleges and educational institutions across the country.

News English Title: Corona virus Lockdown Schools Colleges Still Not Allowed To Open Ministry Of Home Affairs News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x