12 December 2024 12:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

शिवसेना आमदाराने उभारलेला नित्कृष्ट दर्जाचा लाकडी कृत्रिम तलाव कोसळला

Ganeshotsav 2020, Artificial lake collapsed, Mumbai Bhandup

मुंबई, २२ ऑगस्ट : मुंबई : भांडुपमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मुंबईत पहिल्यांदाज लाकड़ी साहित्य वापरून कृत्रिम तलाव उभारण्यात येत असल्याचे सांगून आमदार रमेश कोरगावकर यांच्या हस्ते भूमिपूजनाचा नारळ फुटला. मात्र, उभारणीच्या दुसऱ्याच दिवशी हा कृत्रिम तलाव कोसळल्याने लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. विशेष म्हणजे यात सेनेच्या स्थानिक पदाधिकारीकडून या कामाचे कंत्राट घेण्यात आले होते. यासाठी चार लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्याचे समजते. या कामामुळे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.

मुंबईत पालिकेकड़ून १६७ कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहे. त्यापैकी भांडुपमधील १३ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. मात्र, अद्याप कुठलेच काम पूर्ण झालेले नाही. त्यातही कोरगावकर यांनी भांडुपचे सेंटर पॉइंट असलेल्या लालाशेठ कम्पाउंड येथे डांबरी रस्त्यावर, मुंबईत प्रथमच लाकड़ी साहित्य वापरून कृत्रिम तलाव उभारण्याचा घाट घातला. थाटात १८ ऑगस्ट रोजी याचा भूमिपूजनाचा शुभारंभही पार पडला. सोशल मिडियावर फोटोही शेअर करण्यात आले. गुरूवारी याचे काम पूर्ण झाले. त्यात शुक्रवारी दुपारीच हा कृत्रिम तलाव कोसळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. हे तलाव केन्द्रस्थानी असल्याने ६० टक्के भांडुपकरांना याचा फ़ायदा होणार होता. विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडली असती तर मोठी हानी झाली असती.

तलाव तयार करताना खोल खड्डा खणणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याला आधार मिळाला असता. मात्र, यात डांबरी रस्त्यावर खोदकाम करणे शक्य नाही. त्यात वरच्यावर काम केल्यामुळे हा कोसळला. विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, असे माजी नगरसेविका वैष्णवी सरफरे यांनी सांगितले. त्यात याच आमदारांनी सदर तलावाच्या उदघाटनापूर्वी मनसेच्या एका शाखेसमोर डिवचण्याचा देखील प्रकार घडल्याचं वृत्त आहे.

 

News English Summary: In Bhandup, MLA Ramesh Korgaonkar said that for the first time in Mumbai, an artificial lake is being constructed using wooden materials from an environmental point of view. However, millions of rupees have been lost due to the collapse of the artificial lake on the second day of construction.

News English Title: On the second day of the inauguration the artificial lake collapsed costing millions of rupees in Mumbai Bhandup News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x