4 May 2024 10:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

व्हॅक्सीन घेतल्यावरही अपवादात्मक लोकांना कोरोना का होतो? | घाबरू नका, वास्तव समजून घ्या

corona positive, vaccinated

मुंबई, १० एप्रिल: देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. शनिवारी विक्रमी नवीन संक्रमितांचा आकडा समोर आला. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 44 हजार 829 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी व्हायरस सुरू होण्यापासून ते आतापर्यंत एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी 1.31 लाख रुग्ण आढळले होते.

अ‍ॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी देशभरात 77 हजार 199 लोक बरे झाले, तर 773 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 66 हजार 760 ची वाढ झाली आहे. आतापर्यंत देशात 10 लाख 40 हजार 993 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा आकडा कोरोनाच्या पहिल्या फेजच्या पीकपेक्षाही खूप जास्त आहे.

दुसरीकडे देशात कोरोना लसीकरण देखील मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. मात्र लस घेतल्यानंतरही अपवादात्मक असे कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार समोर आल्याने अनेकांच्या मनात शंका आणि प्रश्न उपस्थित झाले होते आणि ते आजही कायम आहे. त्यामुळे त्या शंका आणि भीतीचे निराकरण होणे अत्यंत गरजेचं आहे.

आता लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो, याची कारणं एका अभ्यासातून दिसून आली आहेत. एका अभ्यासानुसार, कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र, अपवादात्मक केसेसची शक्यता असू शकते. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेशनचा एक रिपोर्ट 2 एप्रिल रोजी छापून आला आहे. कोरोनाच्या दोन लस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसच्या दोन आठवड्यानंतर कोरोना संक्रमण न होण्याची 90 टक्के शक्यता असते. तरीही लोक कोरोना संक्रमित होताना दिसत आहेत. यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे व्हॅक्सीनचा डोस चुकीच्या पद्धतीने घेणं हे आहे.

एका वृत्तवाहिनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कोरोना व्हॅक्सीनला पुरेसं तापमान मिळालं नाही किंवा कोरोनाची लस हातावर चुकीच्या ठिकाणी दिल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कमकुवत इम्यून सिस्टीममुळेही कोरोनाची लागण होऊ शकते. काही लोक कोरोनाचा दुसरा डोस घेण्याआधीही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. मात्र, ज्यांना डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होतो, त्यांच्यामध्ये कोरोनाची अत्यंत सौम्य लक्षण आढळली आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

 

News English Summary: Doubts and questions were raised in the minds of many about the exceptional coronary heart disease after vaccination, and it continues to this day. Therefore, it is very important to resolve those doubts and fears.

News English Title: People tested corona positive even after getting vaccinated news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x