30 April 2024 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस?
x

जगातील सर्वात कडक लॉकडाऊन | ब्रिटनमध्ये तब्बल ९७ दिवसांनी अनलॉक प्रक्रिया सुरु

Britain lockdown

लंडन, १४ एप्रिल: देशभरात कोरोना संसर्ग वेगाने वाढतोय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती तयार झालीय. महाराष्ट्रातही तिच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात जवळपास लॉकडाऊन लागणार हे निश्चित झालंय. त्यामुळे संपूर्ण देशाचं महाराष्ट्राकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या आर्थिक गणितांवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम दिसलेला नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, जगभरात भारतापेक्षा अधिक भयानक परिस्थिती असल्याचं समोर आलं आहे.

ब्रिटन ९७ दिवसांनंतर पूर्ववत होत आहे. जगातील सर्वात लांब व कडक लॉकडाऊन सोमवारपासून अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना अनियंत्रित झाल्याने ५ जानेवारीपासून ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू होता. डिसेंबरपासून ब्रिटनमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध लागू होते. आता पुन्हा अनेक महिन्यांनंतर शेकडो जिम, हेअर सलून, रिटेल दुकाने सुरू झाली. नियोजित योजनेनुसार २१ जूनला पूर्णपणे लॉकडाऊन हटवला जाईल.

४ जानेवारी रोजी जॉन्सन यांनी नवीन निर्बंधांची घोषणा केली होती. तेव्हा प्रत्येक गोष्ट स्पष्ट होती. कोणते क्षेत्र कधी बंद असेल व कोणते सुरू होईल, हे जाहीर होते. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळाची स्थिती नव्हती. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसऱ्या बाजूने लसीकरण करून ब्रिटनने कोरोनाचा वेग नियंत्रित केला. युरोपला मंदगतीने लसीकरण व लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची वेळ आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये दररोज ५५ हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळत होते. आता नव्या रुग्णांची संख्या ४ हजारांहून खाली आहे. ब्रिटनने आपल्या ४८ टक्के लोकसंख्येला लस दिली आहे.

 

News English Summary: Britain is recovering after 97 days. The world’s longest and toughest lockdown has been unlocked since Monday. The lockdown was imposed in Britain from January 5 due to uncontrolled corona. A number of restrictions have been in place in Britain since December.

News English Title: The Great Britain world’s longest and toughest lockdown has been unlocked since Monday news updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x