28 April 2024 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

भाजपवर दबावासाठी तेव्हा चंद्राबाबुं'सोबत 'फोटोसेशन', आज टीडीपी'ला भेट नाकारली?

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेलुगू देसमच्या नेत्यांना भेट नाकारल्याचे वृत्त आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चंद्राबाबुंचा टीडीपी म्हणजे तेलुगू देसम नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याची तयारी आहे. त्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावी या उद्देशाने तेलुगू देसमच्या खासदारांनी उद्धव ठाकरेंची भेट मागितली होती.

मोदी सरकार विरुद्धच्या अविश्वास प्रस्ताव आणण्याआधी भाजपाविरोधातील पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा टीडीपी’चा प्रयत्न होता. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यासंबंधित विरोधी पक्षांना पत्र लिहून पाठिंबा देण्याचं आवाहनही सुद्धा केलं आहे. शिवसेना सरकारमध्ये सामील असली तरी शिवसेना वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला संधी मिळताच लक्ष करते. शिवसेना भाजपला थेट विरोधकांच्या गोटात सामील होऊन उघड विरोध करण्यास न करता अशा रणनीतीपासून स्वतःला दोन पावलं लांब ठेवणं पसंत करत आहे.

भाजप विरोधातील आघाडीत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि पंश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे दोघेही आघाडीवर आहेत. त्यामुळेच शिवसेनेची सत्तेत सामील झाल्यापासूनची भाजप विरोधातील भूमिका आपल्या फायद्याची ठरू शकते असं टीडीपी’ला अविश्वास ठरावाच्या उद्देशाने वाटलं असाव, म्ह्णून शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी टीडीपी’च्या खासदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती, जी नाकारण्यात आली आहे. कारण त्याने भाजपचा मोठा रोष ओढून घ्यावा लागला असता असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जेव्हा भाजपशी संबंध टोकाचे झाले होते तेव्हा याच नेत्यांसोबत भेटीगाठी घेऊन फोटोसेशन सुद्धा केलं होत आणि त्यावर जाहीर ट्विट करत जाणीवपूर्वक भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्नं केला गेला होता. कारण होत टीडीपी’ने तडकाफडकी सत्तेतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यांचे भाजप बरोबर ताणले गेलेले टोकाचे संबंध, ज्याचा शिवसेना नेत्यांनी पुरेपूर फायदा उचलत भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता.

काय होत खासदार संजय राऊतांच तेव्हाच ट्विट?

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x