3 May 2024 8:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Health First | लाल भोपळा आहे आपल्या आरोग्यास फायदेशीर

benefits of eating pumpkin

मुंबई २७ एप्रिल : भोपळा हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर येते ती “चल रे भोपळ्या टुनूक टुनूक” म्हणणारी लहानपणीच्या गोष्टीमधली, लेकीकडे जाणारी म्हातारी आणि जंगली प्राण्यापासून तिला लपवणारा भलामोठा भोपळा. पण भोपळ्याचं महत्त्व या गोष्टींपुरतंच मर्यादीत नक्कीच नाही.

महाराष्ट्रात अनेक सणसमारंभात लाल भोपळ्याची भाजी अगदी आवर्जून केली जाते. पावसाळा सुरू झाला की लाल भोपळा बाजारात दिसायला सुरूवात होते. लाल भोपळ्याचा वापर भाजी, सांबर, पुऱ्या, पछडीमध्ये केला जातो. चवीला उत्कृष्ठ असलेला लाल भोपळा पचायला हलका असल्यामुळे या भाजीला पथ्याची भाजी असंही म्हणतात. लाल भोपळ्याचा वापर आहारात केल्यास अनेक आजार दूर राहू शकतात. कारण लाल भोपळ्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. म्हणूनच आहारात लाल भोपळ्याचा वापर करून घेण्यामागील ही कारणं नक्की जाणून घ्या .

पचनमार्ग सुधारतो :
कपभर वाफवलेल्या भोपळ्यामुळे नियमित 11% फायबरची गरज पूर्ण होते. त्यामुळे पचनमार्ग आरोग्यदायी राहतो तसेच बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होण्यास मदत होते.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते :
भोपळ्यामधून शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटामिन ए चा पुरवठा होतो. कपभर वाफवलेला भोपळा म्हणजे अंदाजे 100 ग्रॅम भोपळ्यातून 245% व्हिटामिन ए ची दैनंदिन गरज पूर्ण होते. तसेच मुबलक बीटा कॅरोटीन मिळते. यामुळे मोतिबिंदू आणि वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या कमजोर होणार्‍या स्नायूंची समस्या कमी होते.

वजन घटवते :
भोपळ्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात कॅलरीज असतात. 100 ग्रॅम भोपळ्यातून 26 कॅलरीज मिळतात. सोबतच त्यात फायबर असल्याने शरीरात फॅट्स न वाढवता भूकेवर नियंत्रण मिळते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते:
भोपळ्यामध्ये व्हिटामिन ए, इ, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. चांगल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे संसर्ग दूर ठेवण्यास तसेच वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते. भोपळ्यातील बीटा कॅरोटीन घटकांमुळे दाह कमी होण्यास मदत होते. P

हृद्यविकार कमी होतात :
हद्याला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमध्ये बॅड फॅट्स साचून राहिल्याने हृद्यविकार जडतात. भोपळ्यातील फायबर घटक ब्लॉकेजेस मोकळे करण्यास मदत करतात. तसेच कमी प्रमाणात कॅरोटेनॉईड आहारात घेतल्यास हृद्यविकार वाढतात. त्यामुळे आहारात भोपळा टाळू नका.

कर्करोगापासून रक्षण होते
लाल भोपळ्यामधील बीटा कॅरोटीन जितके तुमच्या डोळे आणि त्वचेसाठी उत्तम आहे तितकेच ते तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी चांगले आहे. जर तुम्ही नियमित लाल भोपळ्याचा वापर आहारात करत असाल तर तुमच्या आरोग्याला कर्करोगाचा धोका कमी होतो. कारण भोपळ्यामधील पोषक घटक कॅन्सरच्या फ्री रेडिकल्सपासून तुमचे रक्षण करू शकतात.

भोपळ्याच्या बिया देखील असतात उपयुक्त
वास्तविक फळातील बिया जमिनीत रोवून पुन्हा त्या झाडाची निर्मिती केली जाते. खाताना मात्र फळं आणि फळभाज्यांमधील बिया बऱ्याचदा काढूनच टाकल्या जातात. भोपळ्याच्या बिया मात्र आरोग्यासाठी फार उपयुक्त असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 6 फॅटी अॅसिड असते. यासोबतच या बियांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असल्यामुळे या बिया खाणं तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतं.

News English Summary: The word “pumpkin” comes to mind when you hear the word “chal re bhopalya tunuk tunuk” from a childhood story. But the importance of pumpkin is definitely not limited to these things. If red pumpkin is used in the diet, many diseases can be avoided. This is because red pumpkin has many health benefits. So know exactly the reasons behind using red pumpkin in your diet.

News English Title: Eating pumpkin is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x