2 May 2024 4:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

कोरोना परिस्थितीतही CBI राज्यात येते | पण कोरोना परिस्थितीमुळे चौकशीला येऊ शकत नाही असं रश्मी शुक्लांचं उत्तर

IPS officer Rashmi Shukla

मुंबई, २८ एप्रिल | वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले आहेत. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर आहेत.

एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबईतील सायबर सेल विभागाने हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले आहेत.

दरम्यान, चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरं देईन, असं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला दिलं आहे. एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे.

जबाब नोंदवण्यासाठी बुधवार 28 एप्रिल (आज) रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना समन्समध्ये सांगण्यात आले होते. रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांना सध्या चौकशीला येऊ शकणार नसल्याचं कळवलं आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता हजेरी शक्य नसल्याचं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांनी दिलेल्या समन्सला दिलं. फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीसाठी शुक्ला यांना समन्स पाठवण्यात आलं आहे.

महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असं रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितलं. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

 

News English Summary: If you are in a hurry to inquire, send the question, I will answer it, said Rashmi Shukla to Cyber Cell. Rashmi Shukla is accused of illegally tapping the phones of some ministers while working in the SID.

News English Title: IPS officer Rashmi Shukla reply to summons in alleged Maharashtra ministers phone tapping case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x