7 May 2025 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Health First | खोकल्यावर करा हे घरगुती उपचार । नक्की वाचा

home remedies for cough

मुंबई २९ एप्रिल : बदलत्या वातावरणात किंवा थंडीत लहान मुलांना खूप सहज व लवकर सर्दी-खोकला होऊ शकतं.खोकला येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे संक्रमण होय. व्हायरल इन्फेक्शन जसे की सर्दी आणि ताप यामुळे खोकला येतो. एसिड रिफ्लक्स हे एक खोकल्यासाठी कारणीभूत ठरू शकते.अस्थमा सुद्धा खोकल्यामागचे कारण आहे. त्याचे निदान करणे कठीण असते कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये वा बाळामध्ये याची लक्षणे वेगवेगळी दिसतात. परंतु अशी काही लक्षणे आहेत जी अस्थमासाठी सामान्य मानली जातात जसे की खोकताना घरघर आवाज येणे, खासकरून रात्रीच्या वेळी जास्त जोरात खोकला येणे. अॅलर्जी आणि साइनसाइटिस सुद्धा खोकल्याची कारणे आहेत.

काही रामबाण घरगुती उपायांच्या मदतीने त्यांना आराम दिला जाऊ शकतो. जाणून घ्या ते साधेसोपे उपाय! या घरगुती उपायांनी केवळ खोकलाच नाही तर शरीरातील इतर समस्यांवरही फायदा होत असतो. या उपायांमुळे शरीराला कोणतंही नुकसान पोहचत नाही.

जीरे:
जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन आणि अॅन्टिऑक्सिडेंट असतात. जे बॅक्टेरिया, जंतू नष्ट करतात. सर्दी-खोकल्यावर जीरं खाण्याने फायदा होतो. खोकल्यावर कच्चं जिरं किंवा जिऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं.

हळद:
हळदीमध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-फंगल गुण असतात. जे खोकला कमी करण्यास मदत करतात. तसेच हळद कफही कमी होण्यास फायदेशीर आहे. घसा दुखत असल्यास किंवा सूज आली असल्यास हळदीच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानेही आराम पडतो.

मध:
मध खोकल्याची समस्या कमी करतो. मधामध्ये अॅन्टिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. जे सर्दी-खोकल्याची लक्षणं कमी करतात. खोकल्यामुळे होणाऱ्या इतर समस्याही मधामुळे कमी होण्यास मदत होते.

News English Summary: In a changing environment or cold, children can get cold and cough very easily and quickly. The most common cause of cough is infection. Viral infections such as colds and fevers cause coughing. Acid reflux can cause a cough. Asthma is also a cause of cough.

News English Title: Do home remedies for cough news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या