4 May 2024 2:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

देशात 2-3 महिने लसींचा तुटवडा जाणवेल | मार्चमध्ये रुग्णसंख्या वाढल्यानंतर केंद्राने ११ कोटी डोसची ऑर्डर दिली - अदर पुनावाला

India corona pandemic

लंडन ०३ एप्रिल | भारतामध्ये कोरोनाचा विळखा हा दिवसेंदिवस घट्ट होत असताना दिसत आहे. गेल्या 12 दिवसांमध्ये सलग तीन लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण समोर येत आहेत. रविवारी पुन्हा एकदा 3 लाख 50 हजार 598 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 3,071 रुग्णांनी जीव गमावला आहे. आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 2 लाख 79 हजार 882 राहिली. तर एकूण संक्रमितांचा आकडा आता दोन कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. आज ही संख्या 1.99 कोटींच्या पार पोहोचली आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी भारतीय प्रशासन आग्रही दिसत आहे. किंबहुना त्यासाठी पावलंही उचलण्यात येत आहेत. असं असतानाच आता देशात लसींचा मात्र तुटवडा जाणवू लागला आहे. देशात परदेशी लसींचीही आयात करण्यात येत आहे. असं असलं तरीही देशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीनं मात्र हा पुरवठाही पूरेसा नाही हेच चित्र स्पष्ट होत आहे. याचदरम्यान, कोवीशिल्ड लस निर्मिती करण्याऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अदर पूनावाला यांनी येत्या 2- 3 महिन्यांपर्यंत लसींचा तुटवडा अशाच पद्धतीनं जाणवत राहिल असं सूचक वक्तव्य केलं आहे.

आपल्या कंपनीचा बचाव करताना पूनावाला यांनी लसीच्या कमतरतेबाबत राजकीय लोकांकडून आणि टीकाकारांकडून सीरम इन्स्टिट्यूटला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. आमच्याकडे यापूर्वी कोणताही आदेश नव्हता. तसंच वर्षाला १०० कोटी लसींच्या डोसचं उत्पादन करावं लागेल असंही वाटलं नसल्याचं पूनावाला यांनी स्पष्ट केलं.

१६ जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली होती. केंद्र सरकारनं सुरूवातीला सीरमकडून २.१ कोटी डोस मागवले होते. मार्च महिन्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर सरकारनं ११ कोटी डोसची ऑर्डर दिली. सध्या देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. दरम्यान, सरकारनं आपल्या उत्पादनाच्या ५० टक्के लसींची विक्री खुल्या बाजारात करण्याची परवानगीही कंपन्यांना दिली आहे.

सध्याच्या घडीला एका दिवसाला 6- 7 कोटी लसींच्या निर्मितीचा आकडा जुलै महिन्यातच 10 कोटींवर पोहोचू शकेल अशी वस्तूस्थितीही त्यांनी मांडली. मागणी कमी असल्यामुळं याआधी कंपनीनं लसींचं प्रमाण वाढवलं नवंहतं. ज्यामुळंच जुलै महिन्यापर्यंत लसींचा तुटवडा हमखास जाणवण्याची चिन्हं आहेत. लसीला पुढे मागणी नव्हती. आम्ही विचारही केला नव्हता की एका वर्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती करावी लागेल’, लंडनमधील Financial Times ला दिलेल्या मुलाखतीत पुनावालांनी हे वक्तव्य केलं.

संबंधित यंत्रणेला कोविडच्या दुसऱ्या लाटेचा कहर जानेवारी महिन्यापासून अपेक्षितच नव्हता. सर्वांना खरंच वाटत होतं की कोविडच्या संकटाला आपण थोपवू लागलो आहोत, असंही ते या मुलाखतीत म्हणाले. मागील महिन्यात शासनानं सिरमला 3 हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली होती. 18 वर्षांवरील नागरिकांसाठीच्या लसींच्या उत्पादनासाठीही ही तरतूद होती, ही महत्त्वाची माहिती पुनावाला यांनी दिली.

 

News English Summary: The vaccination drive was launched in the country on January 16. The central government had initially ordered 2.1 crore doses of serum. As the number of patients started increasing in March, the government ordered 11 crore doses.

News English Title: As the number of patients started increasing in March, then the union government ordered 11 crore doses said Adar Poonawala in interview news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x