अमित शहा ओव्हर रेटेड राजकीय निवडणूक मॅनेजर वाटतात | ते मग्रुरी आणि पोकळ बाता मारणारे नेते - प्रशांत किशोर

नवी दिल्ली ०३ एप्रिल | रविवारी ५ राज्यांचे निकाल जाहीर झाले, परंतु संपूर्ण देशाचे लक्ष फक्त पश्चिम बंगालमधील चुरशीच्या लढाईवर होते. अपेक्षेप्रमाणे बंगालमध्ये निकालामध्येही ‘खेला’ झाला. राज्याच्या एकूण २९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवून २१४ जागा जिंकल्या, तर राज्यात पहिले भगवे सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला ७६ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे भाजप दोनशेहून अधिक जागा जिंकेल या अमित शहांच्या स्वप्न दाखवणाऱ्या कथा देखील खोट्या ठरल्या आहेत.
कोलकात्यासह शहरी भागांत भारतीय जनता पक्षाला एकही जागा मिळाली नाही. फक्त दार्जिलिंग, कूचबिहार, जलपायगुडीत यश मिळाले. शहरी मतदार भाजपपासून दूरच राहिला. ममतांनी १०० पेक्षा जास्त सभा घेतल्या, तर पंतप्रधान मोदींनी २० व केंद्रीय मंत्र्यांनी ५० पेक्षा जास्त सभा घेतल्या. जिंकलेल्या जागा पाहता ममतांच्या सभा जास्त यशस्वी ठरल्या. त्यामुळे स्वतःला राजकारणातले चाणक्य समजणारे अमित शाह देखील सध्या प्रसार माध्यमांना सामोरे गेलेले नाहीत.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये अमित शहांनी जातीनं लक्ष केंद्रित केलं होतं. परंतु तरी देखील भारतीय जनता पक्षाला शंभरी गाठता आली नाही. या पार्श्वभूमीवर किशोर यांनी शहांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. ‘कदाचित माझ्या बोलण्यात तुम्हाला अहंकार वाटू शकेल. पण मला अमित शहा ओव्हर रेटेड राजकीय आणि निवडणूक मॅनेजर वाटतात. त्यांनी आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये कोणतं व्यवस्थापन कौशल्य दाखवलं?’, असा थेट सवाल प्रशांत किशोर यांनी उपस्थित केला.
गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा करिश्मा आहे. त्यांच्या हाताशी खूप संसाधनं आहेत. संघ आणि पक्षाचं मोठं नेटवर्क त्यांच्याकडे आहे. त्यांच्यामागे सरकार आणि सरकारी यंत्रणादेखील भक्कमपणे उभ्या आहेत. निवडणूक आयोगचे निर्णयदेखील त्यांच्या पथ्यावर पडणारे होते आणि तरीही ते हरले. यावरून तुम्हाला अमित शहांच्या नावलौकिकाची, प्रतिष्ठेची कल्पना येईल, असा टोला त्यांनी लगावला.
अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचं नेमकं काय चुकलं हेदेखील त्यांनी सांगितलं. ‘प्रोपॅगेंडा तुम्हाला निवडणूक जिंकवून देऊ शकत नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये विशेषत: अमित शहांमध्ये खूप मग्रुरी दिसत होती. ते आकाशात उडत होते. त्यामुळे ते जमिनीपासून दूर गेले. आम्ही विजयी होणार आहोत, असं जाहीर करून ते लढायला आले. परंतु, त्या केवळ पोकळ बाता होत्या,’ अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी शहां सह भारतीय जनता पक्षावर टीका केली.
News English Summary: Kishor strongly criticized Shah’s approach. ‘Maybe you feel ego in my speech. But I think Amit Shah is an overrated political and election manager. What management skills did he show in the elections so far? ‘, Was the direct question posed by Prashant Kishor.
News English Title: I PAC founder Prashant Kishor criticized union home minister Amit Shah after West Bengal Assembly Election Result news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER