19 May 2024 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा
x

कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेणे 'मिठी संप्रदायातील' राजकारण्यांना शोभते: विश्वंभर चौधरी

ISRO, K Sivan, Mission Chandrayan 2, ISRO Chairman K Sivan

पुणे: ‘चांद्रयान 2’ मोहीमेत आलेल्या अडचणीमुळे इस्रोचे प्रमुख के सिवन अतिशय भावुक झाले. इस्रोच्या कंट्रोल रुममधील संबोधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर आले आणि भावुक झालेले इस्रो प्रमुख रडू लागले. मोदींनी गळाभेट घेतल्यानंतर के सिवन यांनी अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. यावेळी मोदींनीही भारतीय तुमच्या पाठीशी आहेत, असं म्हणत के सिवन यांना धीर दिला.

‘चांद्रयान 2’ मोहीमेत आलेल्या अडचणीमुळे इस्रोचे प्रमुख के सिवन अतिशय भावुक झाले. इस्रोच्या कंट्रोल रुममधील संबोधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर आले आणि भावुक झालेले इस्रो प्रमुख रडू लागले. मोदींनी गळाभेट घेतल्यानंतर के सिवन यांनी अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. यावेळी मोदींनीही भारतीय तुमच्या पाठीशी आहेत, असं म्हणत के सिवन यांना धीर दिला. मात्र यावरून आता वेगवेगळ्या थरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

काय म्हटलं आहे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये;

चांद्रयान मोहीम यशस्वी झाली नाही ही बातमी दुःखदायक आहे पण इस्रो प्रमुख भावविवश झाले ही बातमी भितीदायक आहे. कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेणे वगैरे मिठी संप्रदायातील राजकारण्यांना शोभते, मिठी मारून रडणे एका वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखास नक्कीच शोभत नाही. सीवन भावविवश झाले असले तरी आपल्या या भावूकतेचाही प्रचारासाठी उपयोग केला जाऊ शकतो हे भान तरी त्यांनी ठेवायला हवे होते.

नासाच्याही अनेक मोहिमा अयशस्वी झालेल्या आहेत पण नासाप्रमुख अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या गळ्यात पडून रडल्याच्या चित्रफिती पाहण्यात नाहीत. फार मोठ्या शास्त्रज्ञांनी इस्रो सांभाळली आहे, अनेक अपयशं पचवली आहेत. मोहीम फत्ते झाली की टाळ्या वाजवून माफक आनंद साजरा करणे आणि मोहीम अयशस्वी झाली तर कारणमीमांसा करून दुसर्या दिवशी पुन्हा कामाला लागणे हीच इस्रो संस्कृती आहे. तीच रहावी.

इस्रो ही वैज्ञानिक संस्था आहे, राजकीय पक्ष नाही. चांद्रयान हे एक जटिल वैज्ञानिक यंत्र आहे, इव्हीएम मशीन नाही. स्वाभाविकच आहे की इस्रोचे यश अनिश्चित असणार. इस्त्रोला शुभेच्छा. इस्रोने इस्रोच रहावे. ह्रदयानं नाही, मेंदूंनंच विचार करावा. इस्रोचं तेच बलस्थान आहे. भविष्यात ही मोहीम इस्रो नक्की यशस्वी करणार यात मला कोणतीही शंका नाही कारण इस्रोची स्थापनाच मजबूत पायावर झालेली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x