4 May 2024 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

कोरोना आपत्तीत चीनचा मोठा निर्णय | भारतासहित जगभरात फटका बसणार

Corona Pandemic

नवी दिल्ली, ०७ मे | देशात सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास दोन हजारांनी वाढ झाली आहे. तर 3 हजार 915 रुग्णांना प्राण गमवावे लागले. आधीच्या दिवशी भारतात एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींची ( 3 हजार 980) नोंद झाली होती. आजचा आकडा कमी असला, तरी त्याच्या जवळ जाणारा आहे. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 31 हजार 507 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ही संख्याही आदल्या दिवसापेक्षा अधिक आहे.

एकाबाजूला भारतात कोरोनाचं थैमान सुरू आहे. मे महिन्यात तीन दिवस देशात ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे परदेशांमधून भारताला मदत मिळत आहे. तर भारतातून मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात सुरू आहे. मात्र चीननं घेतलेल्या एका निर्णयाचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे. भारतात मोठ्या प्रमाणात औषधांचं उत्पादन होतं. देशातून जगभरात औषधं पुरवली जातात. परंतु, चीनच्या एका निर्णयामुळे जगभरात औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

चीननं मालवाहू विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. यासोबतच भारताकडून औषधांची आयात करणाऱ्या देशांसमोरही समस्या निर्माण झाली आहे. अमेरिका औषधांसाठी मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. भारताकडून औषधं आयात करणाऱ्या देशांची संख्या खूप मोठी आहे. मात्र चीननं कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्यानं भारतातील औषध निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरात औषधांची टंचाई निर्माण होऊ शकते.

 

News English Summary: The impact of a decision taken by China is likely to be felt all over the world. India was a major producer of medicines. Medicines are supplied from the country to all over the world. But a decision by China could lead to a worldwide shortage of drugs.

News English Title: Corona pandemic China halting flights world could hurt pharma supplies say companies news updates.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x