औरंगाबाद : मुक मोर्चातून आक्रमक झालेल्या मराठा मोर्चात काल औरंगाबाद इथं मराठा आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा मृत्यू झाला. आज सकाळी काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आले असता मराठा क्रांती मोर्चातील आक्रमक कार्यकर्ते चंद्रकांत खैरेंच्या अंगावर धावून गेले आणि त्यांना अक्षरशः हाकलून देण्यात आहे, तसेच सुरक्षेच्या गराड्यात त्यांना त्यांच्या खासगी वाहनात बसवून निघुन जाण्यास सांगण्यात आलं.
लोकप्रतिनिधींनी येथे येऊ नये अशी तंबीच मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्ष सावध पवित्रा घेतली अशी शक्यता आहे.
