29 April 2024 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

सीरमची टीका | केंद्र सरकारने लसीचा स्टॉक व WHO'च्या मार्गदर्शक सूचनांचा विचार न करता लसीकरण सुरु केलं

India corona pandemic

पुणे, २२ मे | देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशात ४५ वर्षांपुढील व्यक्तीसह १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीपर्यंत लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आल्यानंतर लस तुटवड्याचं संकट उभं आहे. बहुतांश राज्यांतून लस नसल्याची ओरड होत असून, काही राज्यांनी थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून लस खरेदीची तयारी सुरू केली आहे. असं असतानाच सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी लस तुटवड्यावरून केंद्र सरकारकडे बोट दाखवलं आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे एक्सिक्युटिव्हा डायरेक्टर सुरेश जाधव यांनी शुक्रवारी मोठं वक्तव्य केलं. “केंद्र सरकारने लसीच्या साठ्याबद्दल माहिती न घेता तसंच जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक सूचनांवर विचार केल्याशिवाय अनेक वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला परवानगी दिली,” अशी माहितीही त्यांनी दिली.

सुरूवातीला ३० कोटी लोकांचं लसीकरण होणार होतं. ज्यासाठी ६० कोटी लसीच्या डोसची आवश्यकता होती. परंतु ते लक्ष्य गाठण्यापूर्वीच सरकारने ४५ वर्षे आणि त्यानंतर १८ वर्षाच्या वरच्या लोकांच्या लसीकरणाला परवानगी दिली. लस उपलब्ध नाही हे माहित असूनदेखील सरकारनं मंजुरी दिली,” असंही ते म्हणाले. ही सर्वात मोठी शिकवण होती. आम्हाला उत्पादनाची उपलब्धता लक्षात घ्यायला हवी होती. तसंच त्यादृष्टीनं वापर करायला हवा. लसीकरण आवश्यकच आहे. परंतु लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालनही केलं पाहिजे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लसीच्या निवडीबद्दल सांगायचं झालं तर सीडीसी आणि एनआयएच डेटानुसार जी लस उपलब्ध आहे ती घेता येऊ शकते. फक्त त्याला नियममकाद्वारे परवानगी दिली गेली असली पाहिजे. कोणती लस अधिक प्रभावी आहे किंवा नाही हे सांगणं घाईचं ठरेल,” असंही ते म्हणाले.

 

News English Summary: Amid an acute shortage of COVID-19 vaccines in country, executive director of Pune-based Serum Institute of India Suresh Jadhav alleges government began inoculating people from multiple age groups without taking into account available stock of vaccines and WHO guidelines Press Trust of India

News English Title: Serum Institute of India Suresh Jadhav alleges central government over vaccination program news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x