निधी वाटपावरून शिंदे गट तोंडघशी पडला, मुख्यमंत्री पदाला अर्थ नसल्याचं अर्थमंत्री फडणवीसांनी दाखवून दिलं | भाजपाला मजबूत निधी

CM Eknath Shinde | राष्ट्रवादीकडून निधी देण्यात दुजाभाव केला जात आहे. राष्ट्रवादीने स्वत:ला अधिक निधी घेतला. त्यानंतर काँग्रेसला सर्वाधिक निधी दिला. पण शिवसेनेला कमी निधी दिला. आम्ही मतदारसंघात कामं कशी करायची? असा सवाल करत शिंदे गटाच्या आमदारांनी बंड केलं. त्यानंतर या आमदारांनी भाजपशी हात मिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. सत्तेत शिंदे गटाकडे मुख्यमंत्रीपद आलं. पण त्या बदल्यात भाजपने महत्त्वाची खाती घेतली.
शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती :
दुसरीकडे, शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती दिली. त्यामुळे शिंदे गटात नाराजी पसरलेली असतानाच आता शिंदे गटाला निधी कमी दिल्याचं समोर आलं आहे. भाजपने सर्वाधिक निधी घेतला असून शिंदे गटाच्या मंत्र्यांना कमी निधी देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी अवस्था झाली आहे.
शिंदे गटात खळबळ :
भाजपच्या मंत्र्यांच्या खात्यांना 11 हजार 800 कोटींची निधी देण्यात आला आहे. तर शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्यांना 6 हजार 303 कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्यांना कमी निधी मिळाल्याने विरोधकांनी आणि खासकरून शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. पूर्वी अजित पवारांच्याकडे अर्थ खातं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खातं आहे. त्यामुळे शिंदे गट कुणाकडे तक्रार करणार? असा सवाल केला जात आहे.
एकनाथ शिंदेंबद्दल आदित्य ठाकरे काय म्हणाले :
आंदोलकांनी ५० खोके ‘ओके’ असल्याचे जाहीर केले. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. ते शिवसेना नव्हे तर देशद्रोही आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. देशद्रोही आल्याचंही जाहीर करण्यात आलं. सत्ताधारी बाकावर देशद्रोही बसले आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. आमचा व्हीप अधिकृत असेल. आम्ही घटनेनुसार काम करत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ऑफिस कुणाच्या तरी ताब्यात राहील की या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मात्र, या सरकारचे कुणीही काहीही गमावलेले नाही.
हे सरकार बदल्याचं आणि स्थगितीचं झालं आहे. या सरकारला अवघ्या एक दीड महिन्यातच सत्तेचा माज चढला आहे. स्वतःला काय मिळेल यावरच हे नेते नाराज झाले आहेत. आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळाली आहेत असं यांना वाटतं आहे. आमच्याकडे असताना जी मंत्रिपदं मिळाली तीच अनेकांना मिळाली. डाऊनरेट मंत्री झाले आहेत. एवढंच नाही तर खरे मुख्यमंत्री कोण तेच कळत नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले आणि एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: CM Eknath Shinde camp gets very less funds than BJP minister check details 17 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Multibagger Stocks | यादी सेव्ह करा! हे शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील वाचा
-
Budhaditya Rajyog | क्या बात! तुमची राशी 'या' 3 नशीबवान राशींमध्ये आहे का? बुधादित्य राजयोगाने सुख-समृद्धीचा मार्ग खुला होणार
-
Wheat Prices Hike | हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान बातम्यांमध्ये आनंद घेणाऱ्या मतदारांसाठी आनंदाची बातमी, गहू आणि पीठ महाग होणार
-
Kody Technolab IPO | यापूर्वी संधी हुकली? आता कोडी टेक्नोलॅब IPO लाँच झाला, पहिल्याच दिवशी देईल मजबूत परतावा
-
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! 2 महिन्यात पैसे दुप्पट, आता अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीला ऑर्डर मिळाली, पुन्हा मल्टिबॅगर?
-
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत 115 टक्के परतावा देणाऱ्या शक्ती पंप्स शेअरने 1 दिवसात 12 टक्के परतावा दिला
-
Kahan Packaging IPO | मार्ग श्रीमंतीचा! 80 रुपयाच्या IPO शेअरने फक्त एकदिवसात 100 टक्के परतावा दिला, आर्थिक स्ट्रार तेजीत
-
Numerology Horoscope | 17 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
-
Waree Renewable Share Price | मार्ग श्रीमंतीचा! वारी रिन्यूएबल शेअरने 3 वर्षात 1 लाखावर दिला 80 लाख रुपये परतावा, पुढेही मल्टिबॅगर
-
EMS Limited IPO | सुवर्ण संधी! ईएमएस लिमिटेड कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 60 टक्के परतावा देऊ शकतो, करणार खरेदी?