3 May 2025 8:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Health First | जाणून घ्या कांद्याची पात खाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा

benefits of spring onion

मुंबई २४ मे : कांद्याची पात आपण नेहमीच खातो. कांद्याच्या पातीची तुम्ही भाजीही नेहमी करून खाऊ शकता. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून सुरक्षित करण्यासाठीही कांद्याच्या पातीचा उपयोग करून घेता येऊ शकतो. भूक वाढण्यासाठीही कांद्याच्या पातीचा उपयोग करता येतो.सल्फरचा उत्कृष्ट स्रोत कांद्याची पात आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी याचा फायदा होतो. यामध्ये एलिल सल्फाईड आणि फ्लेवोनॉईडसारख्या गोष्टी कॅन्सररोधक असतात. अनेक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी कांद्याच्या पातीचा उपयोग करून घेता येतो.

कांद्याच्या पातीचे फायदे :

1. पातीचा कांदा खाण्याचे बरेच फायदे आहेत. हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवते. त्यात अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. बॅक्टेरियातील प्रतिरोधक गुणधर्मांमुळे ते खाल्ल्याने पचन सुधारते. पातीच्या कांद्यात क्रोमियम असते.

2 .पातीचा कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. पातीचा कांदा चेहर्‍यावरील सुरकुत्या दूर करतो. हे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते. पातीचा कांदा मॅक्रोन्यूट्रिशियन टिकवून ठेवतो.

3.केस गळतीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी पातीचा कांदा खूप प्रभावी आहे. कांद्याचा रस केसांवर मालिश केल्यास केस गळणे थांबते. याव्यतिरिक्त कांद्याची पेस्ट लावल्याने पांढरे केस लहान वयातच काळे होण्यास सुरवात होते.

4. उन्मादग्रस्त रुग्ण बेशुद्ध झाल्यास त्याला कांदा कापून त्याचा वास द्या. या मुळे रुग्ण शुद्धीत येतो. पातीच्या कांद्यात देखील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-हिस्टॅमिन गुणधर्म देखील असतात, म्हणूनच संधिवात आणि दम्याच्या रूग्णांसाठी हे फायदेशीर आहे.

5. लघवी थांबली असेल तर दोन चमचे कांद्याचा रस आणि गव्हाचे पीठ घेऊन शिरा तयार करा. शिरागरम झाल्यावर पोटावर पेस्ट लावल्यास लघवी सुरू होते. कांद्याला पाण्यात उकळवून ते पाणी प्यायल्यानेलघवीशी संबंधित समस्या देखील नाहीशा होतात.

6 . सर्दी किंवा पडसं झाले असेल तर कांदा खाल्ल्याने आराम मिळतो.

7 .कांद्याच्या पातीमध्ये सल्फरचा चांगला स्रोत असतो. यामध्ये एलिल सल्फाईड आणि फ्लेवोनॉईडचे गुण असतात जे कॅन्सर रोखण्यास मदत करतात.

8. हिवाळ्यात ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलची समस्या असते त्यांच्यासाठी हिरव्या पातीचा कांदा उपयोगी ठरतो. हिरव्या पातीच्या कांद्यात क्रोमियम असतं आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

संधिवात मध्ये कांदा खूप फायदेशीर आहे. मोहरीचे तेल आणि कांद्याचा रस मिसळा आणि मसाज केल्याने फायदा होतो. मोतीबिंदू, डोकदुखी, कान दुखणे आणि साप चावणे यासारख्या बर्‍याच सामान्य शारीरिक समस्यांमध्येही कांदा औषध म्हणून कार्य करते. कांद्याची पेस्ट टाचांच्या भेगा पडल्यास त्यावर लावल्याने फायदा होतो.

News English Summary : We always eat onion leaves. You can also eat onion leafy vegetables. It contains many nutrients. It can also be used to protect against serious diseases like cancer. Onion leaves can also be used to increase appetite. The best source of sulfur is onion leaves. It helps to keep the body healthy.

News English Title: Spring onion or onion leaves are beneficiary to our health news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या