18 May 2024 10:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

नद्या, जंगलं संकटात आहेत; निसर्गाचा आदर करा ही तर बुद्धांची शिकवण – नरेंद्र मोदी

PM Narendra Modi

नवी दिल्ली, २६ मे | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी बुद्ध पौर्णिमेच्या औचित्यावर वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये व्हर्चुअली संबोधन केले. यावेळी त्यांनी कोरोना महामारीवर भाष्य केले. ते म्हणाले की, ज्यांनी कोरोना महामारीत आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले, त्यांच्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो. कोरोनाने संपूर्ण जगाला बदलून टाकले. आशा कठीण परिस्थितीत भगवान बुद्धांच्या आदर्शांवर चालण्याची गरज आहे.

हवामानात होणारे बदल, बदलती जीवनशैली पुढील पिढीसाठी धोकादायक आहे. हवामान पद्धतीत बदल होत असून धृवांवरील बर्फ वितळत आहे, नद्या, जंगलं संकटात आहेत. गौतम बुद्धांनी आपल्याला निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. मला अभिमान वाटतो की भारत काही अर्थव्यवस्थांपैकी एक आहे जी शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे असंही ते म्हणाले आहेत.

वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी हवामान पद्दतीत बदल होत असून नद्या, जंगलं संकटात असल्याचा उल्लेख करत निसर्गाचा आदर करणं ही बुद्ध यांनी दिलेली शिकवणं महत्वाची असल्याचं सांगितलं.

1. कोरोनामुळे जग संकटात:
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. या महामारीने जगाला बदलले आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला आहे. या लढाईला सोबत मिळून जिंकावे लागेल.

2. आता महामारीशी लढण्याची समज:
मोदी पुढे म्हणाले की, आता आपल्याकडे या महामारीचा सामना करण्याची समज आली आहे. आता आपल्याकडे व्हॅक्सीन उपलब्ध असल्यामुळे लढाई अजून मजबुत झाली आहे. या संकटाच्या परिस्थितीत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवत आहेत. डॉक्टर्स आणि नर्सचे योगदान कुणीच विसरू शकणार नाही.

 

News English Summary: On the occasion of Vaishakh Buddhist Purnima, Prime Minister Narendra Modi interacted through video conference. At this time, he said, the climate is changing and rivers and forests are in crisis, adding that it is important to respect the teachings of the Buddha.

News English Title: The climate is changing and rivers and forests are in crisis said PM Narendra Modi news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x