3 May 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

निवडणूक रॅलीत सहभागी झालेल्या अमित शहांविरोधात FIR का नोंदवला गेला नाही? - कर्नाटक हायकोर्ट

Amit Shah

बंगळुरू, २६ मे | देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना दुसऱ्याबाजूला ५ राज्यांतील विधानसभा आणि काही ठिकाणी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रॅली आणि सभांमध्ये कोरोनाचे कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचे समोर आले. यावरून कर्नाटक हायकोर्टाने बेळगाव पोलिसांना धारेवर धरले असून, कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांविरोधात FIR का नोंदवला नाही, अशी विचारणा केली आहे.

देशातील त्या ५ राज्यांमध्ये अमित शहा आणि मोदींनी सर्व नियम पायदळी तुडवत प्रचार सभा आणि रॉड शोचा धडाका लावला होता. अमित शहा यांनी सर्वाधिक जोर दिला होता तो रोड शोवर आणि त्यावेळी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं देशाने पाहिलं होतं. इतकंच नव्हे तर पोटनिवडणूक असलेल्या राज्यात देखील तेच पाहायला मिळालं होतं.

बेळगावात १७ जानेवारी रोजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या नेतृत्वाखाली मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केलेले आढळून आले नाही. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी कर्नाटक हायकोर्टाने पोलिसांना खडे बोल सुनावले. भाजपच्या निवडणूक रॅलीत सहभागी झालेले तसेच गृहमंत्री अमित शहांविरोधात FIR का नोंदवला गेला नाही, असा थेट सवाल न्यायालयाने केला.

 

News English Summary: During the hearing on the petition filed in this regard, the Karnataka High Court issued a stern order to the police. The court directly questioned why no FIR was registered against Home Minister Amit Shah and those who participated in the BJP’s election rally.

News English Title: Why not logged FIR against union home minister Amit Shah asked by Karnataka High Court news updates.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x