BREAKING | 'पतंजलि' भेसळयुक्त खाद्यतेल, जिल्हाधिकाऱ्यांच्या धाडीनंतर कारखाना सील

जयपूर, २८ मे | एकीकडे भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) गुरुवारी योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदविली. अॅलोपथीबाबत अप्रामाणिक आणि चुकीचे विचार मांडल्याबद्दल बाबांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणीही करण्यात आली आहे. रामदेव बाबा यांनी प्रस्थापित आणि मान्यताप्राप्त पद्धत आणि औषधांबाबत जाणीवपूर्वक चुकीची, निराधार माहिती पसरवली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
दुसरीकडे, योगगुरू बाबा रामदेव आता राजस्थान सरकारच्या निशाण्यावर आले आहेत. राज्यस्थान सरकारकडून काल रात्री उशिरा ‘पतंजलि’च्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी मोहरीच्या तेलात भेसळ करण्यात येत असल्याचं उघडकीस आलं आहे. यापार्श्वभूमीवर ‘पतंजलि’चा अल्वर येथील खाद्यतेल कारखाना सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईचं व्हिडिओ चित्रिकरणसुद्धा करण्यात आलं आहे.
याआधी बाबा रामदेव यांची कंपनी असलेल्या पतंजलिकडून उत्पादन केल्या जाणाऱ्या मोहरीच्या तेलावर खाद्य तेल उद्योग संघटनेनं (SEA) देखील आक्षेप घेतला होता. एसईएनं ‘पतंजलि’च्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. ज्यात इतर कंपन्यांच्या तेलात भेसळ असल्याचा दावा पतंजलिकडून करण्यात येत होता. दरम्यान, राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील खैरथलमध्ये पतंजलि ब्रँडच्या मोहरी तेलाच्या उत्पादन प्रकल्पात तेलाचं पॅकेजिंग आणि भेसळ केली गेल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. प्रशासनाकडून सिंघानिया आयल मिलवर छापा मारला आणि कारखाना सील करण्यात आला. कारखान्यात ‘पतंजलि’चे पॅकेट्स मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत.
News English Summary: Patanjali’s factory was raided late last night. It has been revealed that mustard oil is being adulterated at this time. Against this backdrop, Patanjali’s edible oil factory at Alwar has been sealed. The action taken under the leadership of the District Collector has also been videotaped.
News English Title: Rajasthan state govt seize edible oil factory Alwar after allegations adulteration Patanjali Sarson oil news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH