7 May 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार? Anup Engineering Share Price | दणादण परतावा देणारा शेअर! 1 दिवसात 19% वाढला, यापूर्वी दिला 876% परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! अल्पावधीत मालामाल करतील, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर खिसे भरणार, HPCL फ्री बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, खरेदीला गर्दी
x

काहींना फक्त राजकारण करायचंय, संभाजी राजेंना नाही | ९ दिवसात चांगला निर्णय घेता येईल - उपमुख्यमंत्री

Maratha reservation

पुणे, २८ मे | आजच्या पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, “7 जूनपर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही, तर आम्ही कोविड वगैरे काही बघणार नाही, असा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिलाय. 6 जूनपर्यंत मी अल्टिमेटम देत आहे. त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा निर्धारही संभाजीराजे छत्रपतींनी बोलून दाखवलाय.

दरम्यान, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, माझी आणि संभाजीराजेंची भेट दारातच झाली. आम्ही एकमेकांना फक्त नमस्कार केला. पण राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधी पुढाकार घेवुन दिलीप भोसले जे अलाहाबाद हाय कोर्टाचे चीफ जस्टीस आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ते आता यावर काम करत आहेत.

मराठा आरक्षण संदर्भात सगळं सुरळीत चाललेलं आहे. तुम्ही त्याला काही वेगळं वळण देऊ नका. संभाजी राजे यांनी ६ जून पर्यंतची मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासंबंधी मुदत दिली आहे.पण या तारखेला अद्यापही ९ दिवस अवकाश आहे. यादरम्यान नक्कीच चांगला निर्णय घेता येईल. मात्र, मराठा आरक्षणावरून काहींना त्यात राजकारणच करायचे आहे, संभाजी राजेंना नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

 

News English Summary: MP Sambhaji Raje has given a deadline of June 6 to take a decision for Maratha reservation. But there is still a gap of 9 days on this date. In the meanwhile a good decision can be made. However, from the Maratha reservation, some people want to do politics in it, not Sambhaji Raje. In such words, Deputy Chief Minister Ajit Pawar has slammed the opposition.

News English Title: Deputy CM Ajit Pawar statement after Chhatrapati Sambhajiraje press conference over Maratha Reservation news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x