19 July 2019 10:00 AM
अँप डाउनलोड

सेनेचे डझनभर मंत्री कुचकामी, आता उद्धव ठाकरेंकडून शहिदांच्या नावाने मतांचा जोगवा

सेनेचे डझनभर मंत्री कुचकामी, आता उद्धव ठाकरेंकडून शहिदांच्या नावाने मतांचा जोगवा

कल्याण : यापूर्वी भाजपचे नेते आणि विशेष करून मोदी आणि अमित शहा शहीद जवानांच्या नावाने मतं मागत होते. आता सत्तेत डझनभर मंत्री असताना देखील सामान्य जनतेसाठी कुचकामी ठरल्याने हबल होऊन उद्धव ठाकरे देखील भर सभांमधून शहीद जवानांच्या नावाने मतं मागत आहेत. महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कल्याण येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैनिकांच्या नावे मताचा जोगवा मागितला आहे.

श्रीकांत शिंदेना मत म्हणजे मोदींना मत, श्रीकांतला मत म्हणजे आपल्या भगव्या युतीला मत आणि श्रीकांतला मत म्हणजे आपल्या सैनिकांना हिंमत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. श्रीकांत खासदार होणे माझ्यासाठी नाहीतर जनतेसाठी गरजेचं आहे. त्यामुळे विजयाचा आशीर्वाद श्रीकांतला द्या, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी लोकांना केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांच्या नावे मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. आता उद्धव ठाकरेंनीही तोच कित्ता गिरवला आहे. दरम्यान यामुळे समाज माध्यमांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#Shivsena(483)#udhav Thakarey(375)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या