मुंबई, १२ जून | मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून आगामी ४८ तासांमध्ये मुंबई व उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची तसेच, काही ठिकाणी अतिमुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच, येत्या पाच दिवसात मुंबईसह कोंकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
दरम्यान, या पावसामुळे जून महिन्याच्या सुरुवातीच्या ११ दिवसांमध्येच ५०५ मिमी या मासिक सरासरी एवढ्या पर्जन्यवृष्टीची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये गेल्या ११ दिवसांत ५६५.२ मिमी पर्जन्यवृष्टी नोंदवली गेली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्रीपासून ते मंगळवारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान, २०० मिमी पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे विरोधकांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काही ठिकाणी पाणी शिरल्याचे सांगत शिवसेना आणि बीएमसीला लक्ष केलं आहे. यावेळी शिवसेना आणि महानगरपालिकेला लक्ष करताना भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आणि त्यात बीएमसीला मेन्शन केलं आहे. त्यांनी आज १:५३ ला संबधित व्हिडिओ ट्विट केला आहे. मात्र व्हिडिओ मुंबईतील नेमका कुठला आहे याची कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे थेट बीएमसीने त्यांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देत संबंधित ठिकाण कोणते आहे असा प्रश्न विचारला आहे. मात्र ३:३० झाले तरी अजून त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे नेटिझन्स त्यांचीच उलटी फिरकी घेत आहेत.
आमच्या पर्यंत पोहोचल्या बद्दल धन्यवाद. आपल्यास योग्य रीतीने मदत करण्यासाठी आणि तक्रार योग्य वॉर्डाकडे पोहचवण्यासाठीआम्हाला अचूक स्थान कळवा.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 12, 2021
