5 May 2024 6:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Corona Alert | कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे स्वरुप बदलले | आधीपेक्षा जास्त धोकादायक बनला डेल्टा+

Delta variant

नवी दिल्ली, १४ जून | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहेच, मात्र गेल्या 72 दिवसातील ही निचांकी आकडेवारी ठरली आहे. कालच्या दिवसात 70 हजार 421 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 3 हजार 921 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

एकीकडे देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे, तर दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस जबाबदार असलेला डेल्टा व्हेरिएंट आता अजून जास्त धोकादायक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डेल्टा व्हेरिएंट आता डेल्टा+ मध्ये बदलला आहे. शास्त्रज्ञांना संशय आहे की, रुग्णांना सध्या दिली जाणारी मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल या नवीन व्हेरिएंट परिणाम करणार नाही. इंग्रजी न्यूज वेबसाइट टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत रिपोर्ट दिली आहे.

टाइम्सच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, ब्रिटनची आरोग्य संस्था पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHE) ने सांगितल्यानुसार, डेल्टा व्हेरिएंटचे 63 जीनोम नवीन K417N म्यूटेशनसह समोर आले आहेत. PHE नुसार, डेल्टा व्हेरिएंटमध्ये रुटीन तपासादरम्यान डेल्टा+ ची माहिती मिळाली. कोविड व्हेरिएंट्सवर PHE च्या लेटेस्ट रिपोर्टनुसार भारतात 7 जूनपर्यंत डेल्टा+ व्हेरिएंटचे 6 रुग्ण आढळले आहेत.

दिल्लीच्या इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटेग्रेटिव बायोलॉजीचे डॉ. विनोद स्केरिया सांगतात की, K417N म्यूटेशनबाबात मोठी चिंता अशी आहे की, याच्यावर अँटीबॉडीज कॉकटेलचा काहीच परिणाम होताना दिसत नाही.

मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल काय आहे?
मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल कॅसिरिविमॅब (Casirivimab) आणि इम्डेविमॅब (Imdevimab) ने तयार झाले आहे. याला फार्मा कंपनी सिप्ला आणि रोश (Roche) इंडियाने मिळून तयार केले आहहे. भारतात याला कोरोना उपचारात आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.

 

News Title: Delta variant changed to more dangerous delta not affected by cocktail of monoclonal antibodies news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x