मुंबई, १४ जून | बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांना सिक्कीम स्टेट बँकमध्ये अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ सिक्कीमने सहाय्यक व्यवस्थापक पदावर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट statebankofsikkim.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदांची संख्या किती:
स्टेट बँक ऑफ सिक्कीममध्ये या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापकाची एकूण २६ पदे नेमणूक केली जातील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून२०२१ आहे. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ०१ जून २०२१ पासून सुरु झालेली आहे.

शैक्षणिक पात्रता ही हवी:
स्टेट बँक ऑफ सिक्कीममधील असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र, लेखा, वाणिज्य, वित्त व्यवस्थापन विषयांत पदवी असणे आवश्यक आहे. यासह, सिक्कीम राज्याच्या भाषेचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती?:
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी २१ वर्षे आणि जास्तीत जास्त ३० वर्षे आहे.

निवड प्रक्रिया:
पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

पगार किती?:
सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३९, १०० ते ५७, ३६७ रुपये पगार देण्यात येईल. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करु शकता…

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

 

News Title: Bank Of Sikkim recruitment 2021 for 26 posts notification released free job alert news updates.

Sarkari Naukri | सिक्कीम स्टेट बँकेत भरती | त्वरा करा