2 May 2025 2:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

प. बंगाल भाजपमध्ये मोठी फूट | 74 पैकी 51 भाजप आमदारच राजभवनात

Suvendu Adhikari

कोलकाता, १४ जून | प. बंगालमधील निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षामध्ये मोठी फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. यावेळी त्याच्या सोबत 74 पैकी केवळ 51 भारतीय जनता पक्षाचे आमदारच राजभवनात जाऊ शकले. या संपूर्ण घटनेने पश्चिम बंगाल भारतीय जनता पक्षामध्ये बंडखोरीचे संकेत मिळत आहेत.

सुवेंदू अधिकारी, राज्यातील निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचारासंदर्भात राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेले एकूण 51 आमदारही होते. परंतु, विधानसभेत भारतीय जनता पक्षाच्या एकूण आमदारांची संख्या 74 आहे. या आमदारांनी हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात राज्यपालांना निवेदन दिले आहे.

इतर 23 आमदार का होते अनुपस्थित? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यापालांच्या बेटीसाठी सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत केवळ 51 आमदारच होते. उर्वरित 23 आमदार अधिकारी यांच्यासोबत गेले नाही. यावरून आता राजकीय चर्चांना उधान आले आहे. विशेष म्हणजे, टीएमसीमधून भाजपत आलेले अनेक नेते, पुन्हा टीएमसीत जात असतानाच असा प्रकार घडला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

 

News Title: West Bengal 23 BJP MLA were absent while opposition leader Suvendu Adhikari’s visit to Raj Bhawan news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या