29 April 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

प्रॉपर्टी डीलरों के सम्मान में, भक्त मंडली मैदान में | भाजप समर्थकांची खिल्ली

Journalist Rohini Singh

मुंबई, १६ जून | राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तुफान राडा झाला आहे. शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. राम मंदिरावरुन शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचे ठरवले होते. मात्र, शिवसेना भवनापासून काही अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये नेले. मात्र, दुसरीकडे काही भाजप कार्यकर्त्यांना माहराण झाली असल्याचेही दिसले. शिवसैनिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनांही काठीने मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

दुसरीकडे, श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्मिती ट्रस्टवर लागलेल्या आरोपांवरून आता शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय बेजबाबदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना त्वरीत पदावरून दूर करावे असे शंकराचार्य म्हणाले आहेत. द्विपीठाधीश्वर जगदगुरूंनी नरसिंहपूर जिल्ह्यातील परमहंसी गंगा आश्रमात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राम मंदिर ट्रस्टवरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला.

शंकराचार्य पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सरकारने ट्रस्ट तर बनवला पण त्यामध्ये भ्रष्टाचारी लोकांना सामावून घेतले. चंपत राय आहेत तरी कोण? यापूर्वी त्याचे नाव कुणीही ऐकलेले नाही. तरीही त्यांना राम मंदिर ट्रस्टचे सर्वेसर्वा करण्यात आले.

देशात सर्वच थरातून याविषयावरून भाजप विरोधात रान पेटलेलं असताना भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मात्र राम जन्मभूमी ट्रस्टचा बचाव करण्यासाठी धडपडत असल्याचं पाहायला मिळतंय. यावरून आता पत्रकारांनी देखील उघड भाष्य करताना भाजप समर्थकांची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात महिला पत्रकार रोहिणी सिंग यांनी भाजप समर्थकांची खिल्ली उडवताना केलेल्या ट्विटला नेटिझन्सकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या विषयावरून मोजक्या शब्दात ट्विट करताना रोहिणी सिंग यांनी म्हटलं आहे की, “प्रॉपर्टी डीलरों के सम्मान में, भक्त मंडली है मैदान में”.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Journalist Rohini Singh criticized BJP supporters over defending Ram Mandir Trust deal of land news updates.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x