15 December 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

आज शेतकरी पराभूत झाला तर भविष्यात या तानाशाही सत्तेपुढे कोणीही आवाज उठवणार नाही

Farmers leader Rakesh Tikait, Modi government, Protesting farmers

नवी दिल्ली, २९ जानेवारी: मागील दोन महिन्यांपासून शांततेत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारीला हिंसक वळण लागलं आणि विषय सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर उत्तर प्रदेश आणि केंद्रातील मोदी सरकारने प्रशासकीय पातळीवर संपूर्ण आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी आंदोलक असलेल्या ठिकाणी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना मॅनेज करून स्थानिकांचा शेतकऱ्यांना विरोध असल्याचं भासविण्यात आलं. वास्तविक हीच स्थानिक लोकं मागील दोन महिने शेतकऱ्यांना पाणी आणि खाण्यापिण्याची सोय करत होते.

शेतकरी नेत्यांवर FIR करून त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याची देखील रणनीती आखण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यासाठी पोलिसांना थेट राकेश टिकैत यांच्याकडे पाठवून आंदोलन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र राकेश टिकैत यांनी केलेल्या भावुक भाषणानंतर संपूर्ण वातावरण पुन्हा पलटू लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकूण मोदी सरकारची दडपशाही पाहता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सामान्य लोकांनाच भविष्याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.

याबतात ट्विट करताना राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे की, “जर आज शेतकरी पराभूत झाला तर भविष्यात या तानशाही सरकारपुढे आवाज उठविण्याची कोणीही हिम्मत करणार नाही…किसान जिंदाबाद

रात्री उशिरा पोलिसांनी टिकेत यांना समजवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांनी आंदोलनस्थळ सोडण्यास नकार दिला. माध्यमांशी संवाद साधताना टिकेत यांना अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांसोबत विश्वासघात झाला आहे. तिन्ही कायदे मागे न घेतल्यास आत्महत्या करेन, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर टिकेत यांनी उपोषण सुरू केलं. यानंतर आंदोलनस्थळावरील परिस्थिती बदलली. राकेश टिकेत यांचे बंधू नरेश टिकेत यांनी आंदोलन संपणार नसल्याची घोषणा मुझफ्फरपूरमध्ये केली.

त्यानंतर नरेश टिकेत यांनी महापंचायतीची घोषणा केली. रातोरात पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणाच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन गाझीपूर सीमा गाठली. सीमेवरील परिस्थिती बदलताच पोलिसांचा पवित्रादेखील बदलला. त्यांना कारवाईला स्थगिती दिली. याशिवाय खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत केला गेला. सध्याच्या घडीला राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. गेल्या काही तासांत गाझीपूर सीमेवरील वातावरण पूर्णपणे बदललं आहे.

 

News English Summary: If the farmer loses today, no one will be able to dare to raise his voice against such a dictatorial government in the future. Kisan Zindabad said farmers leader Rakesh Tikait.

News English Title: Farmers leader Rakesh Tikait criticised Modi government behaviour with protesting farmers news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x