4 May 2025 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू, शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचं कारण काय? म्हणून शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला

MP Sanjay Raut

मुंबई, १७ जून | भारतीय जनता पक्षाचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत यांनी हा इशारा दिला आहे. शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. हुतात्मा चौक जसं आपल्या अस्मितेचं प्रतिक आहे. मराठी माणसाचं केंद्रबिंदू आहे. तुमचे राजकीय मतभेद असू शकतात. पण तसंच शिवसेना भवन मराठी माणसाच्या अस्मितेचं भवन आहे. ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचं कारण काय? तुम्हाला लिहिता वाचता येतं का? तुमचा शिक्षणाशी काही गंध आहे का? तुम्ही सामनाचा अग्रलेख नीट वाचा. जे आरोप झाले ते नीट वाचा. आमचे प्रवक्ते काय म्हणाले ते नीट ऐका. जे आरोप झाले आहेत, त्याची चौकशी करावी. ते आरोप द्वेष बुद्धिने केले असतील तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका. त्यांच्यावर कारवाई करा, असं अग्रलेखात म्हटलं आहे. त्यावरून तुम्हाला मिरच्या का झोंबल्या?, असा सवाल राऊत यांनी केला

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Shivsena MP Sanjay Raut slams BJP party over agitation at Shivsena Bhavan news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या