4 May 2025 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
x

डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे येत्या २ महिन्यात तिसऱ्या लाटेचा धोका | मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना सतर्कतेचे निर्देश

Maharashtra corona pandemic

मुंबई, १७ जून |  महाराष्ट्र सरकारने ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास येत्या एक-दोन महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार. ही शंका राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोरोना टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक झाली. यात कोरोनाचा “डेल्टा प्लस” म्हणजेच AY.1 व्हेरिएंटमुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला आहे.

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेष्ठ डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना औषध आणि आरोग्य उपकरण तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागात औषधांचा साठा करणे आणि आरोग्य सुविधा पुरवण्यावर जोर दिला.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेत ‘डेल्टा वेरिएंट’मुळे रुग्णांची संख्या वाढली होती. आता तिसऱ्या लाटेत ही संख्या अजून वाढू शकते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 19 लाख आणि दुसऱ्या लाटेत जवळपास 40 लाख रुग्णांची नोंद झाली. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, तिसऱ्या लाटेत आठ लाख अॅक्टिव्ह रुग्ण असू शकतात. त्यातील दहा टक्के लहान मुले असतील.

मुख्यमंत्र्यांनी COVID-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा आढावा घेण्यासाठी ही विशेष बैठक बोलावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर सीरो सर्वे करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी त्यांनी मागच्या लाटेतून धडा घेण्यावर जोर दिला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Maharashtra state health department says Delta plus variant may spark in state third wave news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या