27 April 2024 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

हे बाप्पा! देशाचे आर्थिक संकट टळूदे, हिटलर शाही जाऊन लोकशाही नांदू दे: संदीप देशपांडे

Ganapati Bappa, Shir Ganesh Chaturthi

मुंबई : आज घरोघरी श्री गणेशाचं आगमन मोठ्या आनंदात आणि उत्साहात झालं आहे. अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाकडे स्वतःच्या इच्छा व्यक्त करत विघ्नहर्त्याला साकडं घातलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सतत भाजपच्या एकूणच कार्यपद्धतीवर हिटलर शाहीचा आरोप सातत्याने केला आहे. विरोधकांना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप एनेक वेळा विरोधकांनी केला आहे.

मात्र आजच्या शुभ दिनी अनेक राजकारण्यांनी देखील आपल्या लाडक्या बाप्पाकडे साकडं घालत इच्छा व्यक्ती केली आहे. त्यामध्ये राज्यावर येणाऱ्या सर्व संकटांचा सामना करण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणरायाकडे केली आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी म्हटलं की, माझ्या मुलाला मी सगळ्यात जास्त ओळखतो. तो काहीही चुकीचं करणार नाही. त्यामुळं त्यांच्यावरील ‘ईडी’चं विघ्न बाप्पा नक्कीच दूर करेल,’ असा विश्वास त्यांनी आज व्यक्त केला.

दुसरीकडे मनसेला भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धतीचा एक देशावरील एक संकट वाटत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बाप्पाला साकडं घालताना म्हटलं की, ‘देशाचे आर्थिक संकट टळूदे, हिटलर शाही जाऊन लोकशाही नांदू दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना’.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x