21 November 2019 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

खासदार उदयनराजेंचं मन वळविण्यासाठी अमोल कोल्हे साताऱ्यात

MP Amol Kolhe, MP Udayanraje bhosale, NCP

सातारा : खासदार उदयन राजे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसे सुतोवाच उदयनराजेंनी स्पष्टपणे दिलेले नसले तरीही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उदयन राजे लवकरच प्रवेश करतील असे सांगितले आहे. यामुळे एनसीपीच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली असून खासदार अमोल कोल्हे यांनी आज उदयनराजेंची भेट घेत मन वळविण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत ही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांनीही याचे स्पष्ट संकेत दिले होते. “उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षात येतील, त्यांची इच्छा असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांचा भारतीय जनता पक्षा प्रवेश होईल ते राजे आहेत त्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण केली जाईल” असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षात जायचं की नाही हे माझं मी ठरवेन अशीही प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली होती.

त्यांच्या भारतीय जनता पक्ष प्रवेशाबाबत विविध चर्चा सुरु असतानाच रविवारी सत्ता भारतीय जनता पक्षाकडे आहे म्हणून तिथे जाण्यात अर्थ नाही असे वक्तव्य केले. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या भारतीय जनता पक्ष प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आणि त्यांच्या मनधरणीचे प्रयत्नही केले. मात्र “मावळा छत्रपतींच मन वळवू शकत नाही” अशी प्रतिक्रिया त्यांनी या चर्चेनंतर दिली आहे. ही प्रतिक्रियाच बरंच काही सांगून जाणारी आहे.

हॅशटॅग्स

#AmolKolhe(8)#Udayanraje Bhosale(25)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या